आंतरराष्ट्रीय योगदिन कार्यक्रमाचे आयोजन

  जिजाऊ स्कुल ऑफ स्कॉलरच्या नवीन सत्रास प्रारंभ 

खामगाव- दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर व गुंजकर कॉमर्स अँड सायन्स जुनिअर कॉलेज आवारच्या नवीन शैक्षणिक क्षेत्रात उद्या 21 जून योग दिना पासून प्रारंभ होणार आहे. यानिमित्त शाळेमध्ये योग दिन कार्यक्रमाचे आयोजन देखील करण्यात आले आहे.


         अल्पावधीत शैक्षणिक क्षेत्रात वेगळा ठसा व विश्वास निर्माण करणाऱ्या प्राध्यापक रामकृष्ण गुंजकर  सरांच्या जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलर व गुंजकर कॉमर्स अँड सायन्स कॉलेज आवार येथे यावर्षी देखील अनेक नवीन विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला असून शाळेला दिवसेंदिवस चांगला प्रतिसाद मिळताना दिसून येत आहे. दर्जेदार शिक्षणाबरोबरच शाळेमध्ये मिळणाऱ्या सोयी सुविधा यामुळे विद्यार्थी व पालकांचा जिजाऊ स्कूल ऑफ स्कॉलरकडे ओढा वाढलेला दिसत आहे. दरम्यान दरवर्षीप्रमाणे आंतरराष्ट्रीय योग दिनी म्हणजेच 21 जून रोजी या शाळेच्या नवीन सत्रास प्रारंभ होणार आहे. नवीन सत्र प्रारंभ होण्यापूर्वी शाळेच्या वर्गखोल्याची सजावट करण्यात आली आहे.विद्यार्थी व पालकांच्या स्वागतासाठी  वेगवेगळ्या प्रकारच्या पथका तोरणे बांधण्यात आले असून विद्यार्थ्यांचे अनोख्या पध्दतीने स्वागत करण्यात येणार आहे. याच बरोबर शाळेच्या भव्य प्रांगणावर आंतरराष्ट्रीय योग दिन कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे या कार्यक्रमाकरिता योगशिक्षक राजेंद्र राजपूत यांना आमंत्रित करण्यात आले असून ते विद्यार्थ्यांना योगाचे धडे देणार आहेत. तरी सर्व विद्यार्थ्यांनी उद्या सकाळी 7.30 वाजता स्पोर्ट गणवेशात शाळेत उपस्थित रहावे असे आवाहन करण्यात आले आहे.


Post a Comment

أحدث أقدم