गौतम गवई यांची यवतमाळ जिल्हा प्रभारी पदी नियुक्ती

खामगाव - येथिल उद्योजक तथा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अनुसूचित जाती विभागाचे प्रदेश सचिव गौतम गवई यांची काँग्रेस पक्षाच्या यवतमाळ जिल्हा प्रभारी पदी नियुक्ती केली आहे.


सामाजिक क्षेत्रात काम करणारे गवई यांना दोन वर्षांपूर्वीच पक्षाने प्रदेश वर सचिव म्हणून संधी दिली. त्यानंतर झालेल्या भारत जोडो यात्रे दरम्यान प्रसार व प्रचाराचे काम चांगले केले.तसेच काँग्रेस पक्षाच्या बॅनर खाली गौतम गवई यांनी सामान्य जनासाठी विविध प्रश्नावर आवाज उचलला. मेळावे घेऊन तरुणांमध्ये चैतन्य निर्माण केले. याचीच दखल घेत महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अ. जा.प्रदेशाध्यक्ष डॉ. सिद्धार्थ भाऊ हत्तीआंबीरे यांच्या आदेशानुसार गौतम गवई यांची यवतमाळ प्रभारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.  या नव्या जबाबदारी मुळे गवई यांचा चाहता वर्ग आनंदित झाला असून त्यांच्या अभिनंदनाच्या पोस्ट सोशल मीडियावर मोठया प्रमाणात व्हायरल होत आहेत.पुरोगामी आणि समतावादी भूमिका घेऊन लोकांपर्यंत पोहोचून काँग्रेसचे संघटन अधिक मजबूत करू, असा आशावाद व्यक्त करतांना गौतम गवई यांनी आपल्या या नियुक्तीचे श्रेय डॉ. नितीन राऊत, मुकुल वासनिक, प्रदेशाध्यक्ष नाना पटोले,डॉ. सिद्धार्थ हत्तीआंबीरे, राजेश लाडे, विजय अंभोरे यांना दिले आहे.

Post a Comment

أحدث أقدم