ग्रामपंचात संभापूर येथील महिलांना अहिल्या देवी पुरस्काराने सन्मानित करण्यात येणार...
संभापूर:- पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त खामगाव तहसीलच्या संभापूर ग्रामपंचायतीच्या वतीने महिला व बालविकास क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांना प्रोत्साहन देण्यासाठी अहिल्यादेवी पुरस्कार देण्यात येणार आहे. ३१ मे रोजी पंचायत भवनात या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.
संभापूर ग्रामपंचायत स्तरावर दोन महिलांना पंचायत भवनात या पुरस्काराने गौरविण्यात येणार आहे. प्रमाणपत्र, स्मृतीचिन्ह, शाल, श्रीफळ आणि रु.500 असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. या पुरस्कारासाठी अर्ज करणाऱ्या महिला ग्रामपंचायत क्षेत्रातील रहिवासी तसेच बालविकास, बालविवाह प्रतिबंध, हुंडा निर्मूलन, घरगुती हिंसाचार, बालविकास विभागाचे बचत गट, आरोग्य साक्षरता, बालिका शिक्षण या क्षेत्रात उत्कृष्ट कार्य करणाऱ्या महिलांची या पुरस्कारासाठी निवड करण्यात येणार आहे. . या महिलांची निवड सरपंचाकडून केली जाते. निवड समिती अध्यक्षस्थानी असेल. निवड समितीमध्ये ग्रामसेवक, पोलीस पाटील, प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक, अंगणवाडी सेविका, आशा वर्कर यांचाही समावेश आहे.
إرسال تعليق