द रियल न्यूज

बँकेने दोन हजारच्या नोटा स्वीकारण्यास नकार दिला तर काय कराल? जाणून घ्या!

RBI on 2000 Rs Notes : बँकामध्ये २३ मे २०२३ पासून ते ३० सप्टेंबरपर्यंत २००० रुपयांच्या नोटा बदलून देण्याचे काम सुरू राहणार आहे. कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी बँकेच्या कामकाजाच्या वेळेत या नोटा कधीही बदलून घेता येतील.

 २००० रुपयांच्या नोटा रद्द  

Rs 2000 Notes Withdrawn from : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. काल, १९ मे रोजी यासंदर्भातील मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे २ हजारच्या नोटा आहेत, त्यांनी तत्काळ बँकेत जाऊन बदलून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ३० सप्टेंबरपर्यंत नागरिक २ हजारच्या नोटा बँकेतून बदलून घेऊ शकतात. परंतु, विविध कारणांमुळे बँका नोटा बदलून देण्यास नकार देऊ शकते. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास काय करायचं? असा प्रश्न तुम्हाला सतावत असेल. बँकेने नोटा बदलून देण्यास नकार दिला तर काय कराल हेच आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.

बँकेने नोटा बदलून नकार दिल्यास काय कराल?

तुमच्याकडील दोन हजारच्या नोटा तुम्ही बँकेत बदलायला गेल्यास बँक तुम्हाला नकार देऊ शकते.अशावेळी सर्वांत प्रथम संबंधित बँकेत तक्रार दाखल करावी.बँकेत तक्रार दाखल केल्यानंतर ३० दिवसांनीही बँकेने तुमच्या तक्रारीची दखल घेतली नाही तर Reserve Bank – Integrated Ombudsman Scheme (RB-IOS), 2021 याअंतर्गत तक्रारदार तक्रार दाखल करू शकते. cms.rbi.org.in. या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तक्रार दाखल करू शकता.

तुमच्याकडे २००० रुपयांची नोट आहे, मग तुम्ही काय कराल?

तुमच्याकडे २००० रुपयांच्या नोटा असतील तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्या बदलून घेऊ शकता, यासाठी आरबीआयने पुरेसा वेळ दिला आहे.

RBI on 2000 Rs Notes : बँकामध्ये २३ मे २०२३ पासून ते ३० सप्टेंबरपर्यंत २००० रुपयांच्या नोटा बदलून देण्याचे काम सुरू राहणार आहे. कोणतीही गैरसोय टाळण्यासाठी बँकेच्या कामकाजाच्या वेळेत या नोटा कधीही बदलून घेता येतील.

 २००० रुपयांच्या नोटा रद्द !  

Rs 2000 Notes Withdrawn from : रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाने २ हजार रुपयांच्या नोटा चलनातून बंद करण्याचा निर्णय घेतला आहे. काल, १९ मे रोजी यासंदर्भातील मोठी घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे ज्यांच्याकडे २ हजारच्या नोटा आहेत, त्यांनी तत्काळ बँकेत जाऊन बदलून घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे. ३० सप्टेंबरपर्यंत नागरिक २ हजारच्या नोटा बँकेतून बदलून घेऊ शकतात. परंतु, विविध कारणांमुळे बँका नोटा बदलून देण्यास नकार देऊ शकते. अशी परिस्थिती निर्माण झाल्यास काय करायचं? असा प्रश्न तुम्हाला सतावत असेल. बँकेने नोटा बदलून देण्यास नकार दिला तर काय कराल हेच आम्ही तुम्हाला आज सांगणार आहोत.

बँकेने नोटा बदलून नकार दिल्यास काय कराल?

तुमच्याकडील दोन हजारच्या नोटा तुम्ही बँकेत बदलायला गेल्यास बँक तुम्हाला नकार देऊ शकते.अशावेळी सर्वांत प्रथम संबंधित बँकेत तक्रार दाखल करावी.बँकेत तक्रार दाखल केल्यानंतर ३० दिवसांनीही बँकेने तुमच्या तक्रारीची दखल घेतली नाही तर Reserve Bank – Integrated Ombudsman Scheme (RB-IOS), 2021 याअंतर्गत तक्रारदार तक्रार दाखल करू शकते.c ms.rbi.org.in. या संकेतस्थळावर जाऊन तुम्ही तक्रार दाखल करू शकता.

तुमच्याकडे २००० रुपयांची नोट आहे, मग तुम्ही काय कराल?

तुमच्याकडे २००० रुपयांच्या नोटा असतील तर तुम्हाला घाबरण्याची गरज नाही. तुम्ही तुमच्या सोयीनुसार त्या बदलून घेऊ शकता, यासाठी आरबीआयने पुरेसा वेळ दिला आहे.

Post a Comment

أحدث أقدم