खामगावातील ‘शासन आपल्या दारी’मध्ये दहा हजार लाभार्थ्यांना लाभ
बुलडाणा, दि. 25 : खामगाव तहसील कार्यालयातर्फे आयोजित ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमात 10 हजार 640 लाभार्थ्यांना लाभ देण्यात आला. खामगाव तालुका प्रशासनाने गुरुवारी, दि. 25 मे 2023 रोजी या उपक्रमाचे आयोजन केले होते.
आमदार अॅड. आकाश फुंडकर अध्यक्षस्थानी होते. यावेळी प्रभारी जिल्हाधिकारी भाग्यश्री विसपुते यांची प्रमुख उपस्थिती होती. शासनाच्या विविध विभागांकडून देण्यात येणारे लाभ पात्र लाभार्थ्यांना एकाच छताखाली देण्यासाठी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रम राबविण्यात आला. यावेळी शासनाच्या 16 विभागांनी माहिती देणारे स्टॉल उभारले होते.
आज खामगाव येथे झालेल्या ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमात महसूल विभागाचे 4 हजार 968, पंचायत समिती 1 हजार 300, कृषी विभाग 937, नगरपालिका 784, सहकार व पणन विभाग 384, एकात्मिक बालविकास सेवा योजना प्रकल्प 1 हजार 874, आरोग्य विभाग 393 अशा एकूण 10 हजार 640 लाभार्थ्यांना लाभ मंजूर करण्यात आले. यावेळी प्रातिनिधिक स्वरूपात लाभाचे वितरण करण्यात आले. तसेच सलोखा योजनेंतर्गत शिर्ला नेमाने यांना तालुक्यातील पहिल्या अदलाबदल दस्तावेजाचे वितरण आमदार श्री. फुंडकर यांच्या हस्ते करण्यात आले.
शिबिरात मदत कक्ष, हिरकणी कक्ष यांच्यासह विविध विभागाचे 16 स्टॉल उभारले. याठिकाणी नागरिकांना योजनांची माहिती आणि पात्र लाभार्थ्याना थेट लाभ वितरीत करण्यात आले. आरोग्य विभागाने आरोग्य शिबीर घेतले. यावेळी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. नागरीकांनी ‘शासन आपल्या दारी’ उपक्रमाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.शिबीरात महसूल, पंचायत समिती, नगर विकास, आरोग्य, कृषी, एकात्मिक बालविकास, राज्य परिवहन, सार्वजनिक बांधकाम, नोंदणी व मुद्रांक, सहकार यासह तालुकास्तरीय विविध विभागाचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते.
00000
إرسال تعليق