12 वी चा गणित पेपरफुटी प्रकरणाचा एस आय टी चा अहवाल गुलदस्त्यात...! आज 12 वी चा निकाल... कारवाई संशयाच्या भोवऱ्यात..?
खामगाव:-
आज बारावीचा निकाल आहे.... मात्र बारावीची परीक्षा सुरू असताना बुलढाणा जिल्ह्यातील सिंदखेडराजा तालुक्यातील राजेगाव येथील बारावीच्या केंद्रावरून गणिताचा पेपर फुटल्याने राज्यभरात खळबळ माजली होती... याप्रकरणी पोलिसांनी तात्काळ आठ लोकांना अटक ही केली होती .यातील दोन जण संस्था चालक असल्याचीही माहिती पोलिसांनी दिली. प्रकरणाची गांभीर्यता बघता सरकारने पेपरफुटी प्रकरणाची चौकशी करण्यासाठी मेहकर चे उपविभागीय पोलीस अधिकारी यामावार यांच्या नेतृत्वात एक एस.आय.टी. सुद्धा स्थापन केली होती परंतु या एसआयटीचा अहवाल अद्यापही गुलदस्त्यात आहे .... तर अटक करण्यात आलेले आठ आरोपी हे जामीनावर सुटले आहेत. मात्र यामुळे हुशार विद्यार्थ्यांचे मोठे नुकसान होणार आहे. या सर्व प्रकरणात एसआयटी स्थापन करण्यात येऊनही , या एसआयटीचा अहवाल अद्याप गुलदस्त्यात आहे तर विद्यार्थ्यांच्या भवितव्याशी खेळणाऱ्या यातील आरोपी हे जामीनावर मोकाट आहे. आज बारावीचा निकाल आहे मात्र पेपर फुटी प्रकरणातील आरोपींचा निकाल कधी ....? असा प्रश्न. आता उपस्थित राहत आहे. विशेष म्हणजे या प्रकरणात बोर्डाने पेपर फुटलाच नसल्याची भूमिका घेतली होती मात्र बुलढाण्यातील भारत विद्यालय केंद्रप्रमुखात असलेले शिक्षक घोंगटे यांनी पेपर फुटल्याची व पेपर सुरू असताना माध्यमांच्या कॅमेरासमोर पेपर दाखवूनही अद्याप माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने त्यांच्यावर कुठलीही कारवाई केलेली नाही. राज्यात पेपर फुटीचा हे मोठं प्रकरण असतानाही अद्याप माध्यमिक व उच्च माध्यमिक मंडळाने यावर कुठलीही कारवाई केली नसल्याचा समोर आलेल आहे.... त्यामुळे मात्र हुशार विद्यार्थ्यांचे नुकसान होणार आहे. आणि याचा निकालावर परिणाम होणार आहे. आज बारावीचा निकाल असूनही अद्याप पेपर फुटी प्रकरणी माध्यमिक उच्च माध्यमिक मंडळाने या पोलिसांनी या प्रकरणावर कुठलीही ठोस कारवाई केली नसल्याचेही समोर आला आहे.
إرسال تعليق