नि:शुल्क उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क :-क्रीडा व युवक सेवा संचालनालय महाराष्ट्र राज्य पुणे ,जिल्हा क्रीडा अधिकारी बुलढाणा, तालुका क्रीडा अधिकारी खामगाव,व श्रीमती एस आर मोहता महिला महाविद्यालय खामगाव व अ.खि. नॅशनल हायस्कूल व ज्युनिअर कॉलेज खामगाव यांच्या संयुक्त विद्यामाने सर्व शालेय व महाविद्यालयीन विद्यार्थ्यांकरता दिनांक 15 ते 25 एप्रिल 2023 पर्यंत निशुल्क उन्हाळी क्रीडा प्रशिक्षण शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्येयोगा,जिम्नास्टिक ,एरोबिक्स, जुडो, कराटे, बॉक्सिंग ,कुस्ती , कब्बडी,रोप मलखांब, मैदानी खेळ, बुद्धिबळ ,क्रिकेट ,बास्केटबॉल, इत्यादी सर्व प्रकारच्या खेळांचा समावेश करण्यात आला असून प्रशिक्षणासोबतच विद्यार्थ्यांमध्ये विविध कला गुण व व्यक्तिमत्व विकासास सुद्धा वाव देण्यात येणार आहे .या शिबिराचा सर्व विद्यार्थ्यांनी व विद्यार्थिनींनी लाभ घ्यावा, असे आयोजकाच्या वतीने कळविण्यात आले आहे.
إرسال تعليق