घरगुती वापरातील चार गॅस सिलेंडर, ऑटो सह 94 हजाराचा मुद्देमाल जप्त
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- घरगुती गॅस सिलेंडर मधून ऑटो मध्ये गॅस भरत असलेल्या अवैध पॉईंट वर उपविभागीय पोलीस अधिकारी अमोल कोडी यांच्या पथकाने आज दुपार दरम्यान छापा टाकला यामध्ये पोलिसांना चार गॅस सिलेंडर पाच नळ्या असा एकूण 94 हजाराचा मध्यमान मिळून आला पोलीस सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एका टिनपत्राच्या घरामध्ये सैयद रिजवान सैयद अमीर वय 40 वर्षे रा फाटकपुरा, अब्दुल चौक, खामगांव हा प्रवाशी ॲटो चालक मोहम्मद अख्तार मोहम्मद मुस्ताफा वय 55 वर्षे रा बोरीपुरा, शिवाजी वेस, खामगांव याचे ॲटो (एम एच 30 पी 6073) मध्ये एच पी कंपनीचे घरगुती सिलेडर मधुन प्रवासी ॲटो मध्ये कॉम्प्रेसरचे साहायाने गॅस भरत असल्याचे पोलिसांना आढळले. तसेच सोबत 4 सिलेंडर एच पी कंपनीचे अंदाजे कि 4000/- 1कॉम्प्रेसर अंदाजे कि 35000/- 2 मोटर (अर्धा व पाउण इंची) अंदाजे किंमत 8000 / -, 4 रबरी नळया 5 फुट अंदाजेकिंमत 500/- 3 रेग्युलेटर अंदाजे किंमत 3000 /- वजन काटा स्टॅण्ड सह अंदाजे किंमत 5000 /- व प्रवाशी अॅटो क्रMH30 P6073 अंदाजे किंमत 38500/- असा अंदाजे एकुण 94000 / - (चौ-यानऊ हजार किंमतीचे साहित्य ) जप्त करून कारवाही केली
إرسال تعليق