💥24 मार्च जागतिक क्षयरोग दिवस💥

 टीबी म्हणजेच  हा जगातील सर्वात घातक संसर्गजन्य आजार मानला जातो. हा रोग मायक्रो बॅक्टरियम ट्यूबर्क्युलोसिस नावाच्या जिवाणूमुळे होतो .आणि त्याचा फुफुसावर परिणाम होतो. टीबी हा इतर अवयव ना देखील परिणाम करू शकतो परंतु जास्त समस्या  फुफुसांना असते .भारतामध्ये मागील वर्षभरात टीबीच्या पाच लाख रुग्णांचा मृत्यू झाला आहे.टीबी ची अशी प्रकरणे संपवण्याकरता केंद्र शासनाने 2025 सालापर्यंत देशाला क्षयरोगमुक्त करण्याचे उद्दिष्ट समोर ठेवले आहे. या अंतर्गत राष्ट्रपती व पंतप्रधान यांनी प्रधानमंत्री टीबी मुक्त भारत अभियानाला सुरुवात केली असून ते एक लोक चळवळ बनण्याचे आवाहन केले आहे .देशातील टीबी रुग्णांची स्थिती टीबीमुळे सर्वात जास्त मृत्यू हे तरुणांचेच होत असून त्यामध्ये 15 ते 30 वयोगटातील तरुणांचा आकडा सर्वात अधिक आहे राज्यांची आकडेवारी पाहिली तर उत्तर प्रदेश आणि महाराष्ट्रात टीबीचे सर्वाधिक रुग्ण आहेत उत्तर प्रदेश मध्ये 20 टक्के महाराष्ट्रात नऊ टक्के रुग्ण आढळलेले आहेत .टीबीचे पाच मोठे रिक्स फॅक्टर त्यामध्ये कुपोषण मद्यपान धूम्रपान मधुमेह आणि एचआयव्ही हे टीबीचे पाच मोठे फॅक्टर्स आहेत .क्षयरोगाची लक्षणे दोन आठवड्यापेक्षा जास्त खोकला दोन आठवड्यावरून अधिक ताप वजनात घट भूक मंदावणे मानेवर गाठी येणे यापैकी लक्षणे आढळल्यास आपल्या नजीकच्या शासकीय रुग्णालयामध्ये याची तपासणी मोफत केल्या जाते. त्याचबरोबर जोपर्यंत टीबीचे मेडिसिन सुरू आहे .तोपर्यंत पेशंटला दरमहा पाचशे रुपये पोषण आहारा करीता निधी मिळतो. या 24 मार्च जागतिक क्षयरोग दिनाच्या निमित्ताने आपणास आवाहन करण्यात येते की आपल्या आजूबाजूला जर क्षयरोगाचे लक्षणे आढळणारी व्यक्ती जर दिसल्यास त्यांना नजीकच्या सरकारी दवाखान्यामध्ये जाण्याचा सल्ला द्या तसेच शहर रुग्णांना रोखण्यास प्रशासनाला मदत करा .

👉🏾अभिजीत सरदार

 वरिष्ठ क्षयरोग पर्यवेक्षक .तालुका आरोग्य अधिकारी कार्यालय शेगाव


Post a Comment

أحدث أقدم