टेंभुर्णी येथील युवकाची गळफास घेऊन आत्महत्या
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क
तालुक्यातील टेंभुर्णी येथील 25 ते 30 वर्षीय युवकाने लिंबाच्या झाडाला गळफास घेऊन जगाचा निरोप घेतला. ही घटना आज सकाळी शेलोडी रोडवरील एका शेतात घडली..
भागवत गजानन काळने असे आत्महत्या केलेल्या तरुणाचे नाव आहे. भागवत याच्या विवाहाला अजून एक वर्ष पूर्ण झाले नाही तोच त्याने केलेल्या आत्म्हतेमुळे कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळलेला आहे .भागवत काळणे याच्यावर कर्ज होते अशी माहिती नातेवाईकांनी दिली वृत्तलेपर्यंत पोलीस कारवाई सुरू होती.
إرسال تعليق