वन्यजीव प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.


जनुना येथे वन्यजीवांचे होणार  उपचार: ट्रिटमेंट सेंटर साठी 10 कोटी 50 लक्ष निधी मंजूर कोलकत्या नंतर खामगांव मतदार संघातच होईल नवीन ट्रान्सीट सेंटर



खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:-

खामगांव विधानसभा मतदार संघात बुलढाणा प्रादेशीक वन विभाग- खामगांव वनपरिक्षेत्रात ज्ञानगंगा अभयारण्य असून या जंगलात बिबट, अस्वल, काळविट, निलगाय, साळींदर अनेक प्रकारचे संरक्षीत पक्षी यासह विविध वन्यप्राणी आहेत.  अनेक वेळा सदरचे प्राणी जखमी किंवा आजारी असतात या प्राण्यांना योग्य उपचार न मिळल्यामुळे त्यांना प्राण गमवावे लागतात.  यासाठी खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाश फुंडकर यांनी खामगांव येथे नवीन ट्रान्सीट ट्रिटमेंट सेंटर खामगांव येथे स्थापन करण्याबाबतचा प्रस्ताव सादर करण्याची सुचना केली व त्यानुसार त्याचा पाठपुरावा करुन सदरचे सेंटर खामगांव तालुक्यातील जनुना येथे मंजूर करण्यात आले आहे.


सद्यस्थ‍ितीत केवळ नागपूर व पुणे येथेच वन्यजीवांना उपचारार्थ न्यावे लागते. त्यामुळे ज्ञानगंगा, अंबाबरवा व लोणार अभयारण्यात जखमी अथवा आजारी वन्यजीव असल्यास त्यांना उपचारार्थ नागपूर अथवा पुणे येथे नेण्यास 300 ते 500 कि.मी. चा प्रवास करावा लागतो त्यामुळे त्यांचे जिवीतास हानी पोहचते.  या सर्व अभयारण्यात अस्वलांची मोठी संख्या आहे.  या अस्वलांचे संरक्षणासाठी व उपचारार्थ विशेष सेंटर स्थापन करण्याचा प्रस्ताव सहाय्यक वन संरक्षक बुलढाणा यांनी डिसेंबर 2022 दरम्यान वनविभागास परिपुर्ण प्रस्ताव सादर केला आहे.

Advt.

अशा प्रकारचे ट्रान्सीट ट्रिटमेंट सेंटर कोलकता पश्चीम बंगाल येथे आहे. आता अशाच प्रकारचे अद्यावत असे ट्रान्सीट ट्रिटमेंट सेंटर खामगांव मतदार संघातील मौजे जनुना येथे वनपरिक्षेत्रात करण्यात येणार आहे.  यासाठी एकुण 10 कोटी 50 लक्ष एवढा निधी मंजूर करण्यात आला आहे.  

यामुळे वन्यजीव प्रेमींमध्ये आनंदाचे वातावरण आहे.  कारण या सेंटर मुळे बुलढाणा जिल्हयातील तिन्ही अभयारण्यातील अस्वल व इतर प्राण्यांचे उपचारात मदत होणार आहे.  मागील काही वर्षात खामगांव मतदार संघातील वनपरिक्षेत्रात अनेक विकास कामे झाली असून यामध्ये पर्यटकांसाठी सफारी देखील आमदार ॲड आकाश फुंडकर यांच्या मार्गदर्शनात सुरु करण्यात आले आहे.  येत्या काळात देखील खामगांव मतदार संघातील पर्यटकांसाठी मोठया प्रमाणात आवश्यक सेवा सुविधा पुरविण्यात येणार आहे.

Post a Comment

أحدث أقدم