रूपेश खेकडे यांची दैनिक पथप्रदिपच्या कार्यकारी संपादकपदी नियुक्ती
खामगाव ( का. प्र. ) -बुलडाणा जिल्ह्यात गेल्या १२ वर्षापासून सातत्याने खामगांव शहरातून प्रकाशित होणाऱ्या दैनिकपथप्रदीपच्या कार्यकारी संपादक पदी अटाळी येथील सामाजिक कार्यकर्ते तथा भाजयुमोचे तालुका अध्यक्ष रूपेश खेकडे यांची नियुक्ती करण्यात आली आहे. ही नियुक्ती मुख्य संपादक योगेश वामनराव हजारे यांनी केली आहे. यावेळी उपसंपादक हरीभाऊ जुमळे यांच्यासहआदींची उपस्थिती होती. रूपेश खेकडे हे गेल्या १२ ते १५ वर्षापासून सामाजिक कार्यात अग्रसेर असून लोकांच्या समस्या त्यांना चांगल्या प्रकारे माहिती आहे. हे प्रश्न व समस्या मी वृत्तपत्राच्या माध्यमातून सोडविण्यासाठी कटीबद्ध असल्याच्या प्रतिक्रीया रूपेश खेकडे यांनी नियुक्ती प्रसंगी बोलतांना दिल्या आहेत.
إرسال تعليق