महिला आघाडी नी मोठ्या संख्येने उपस्थित राहावे-सौ.प्रेरणा खराडे
खामगाव : शिवसेना मेळावा शिवगर्जना सप्ताह अंतर्गत शिवसेना ( उध्दव बाळासाहेब ठाकरे ) उपनेत्या सुषमाताईअंधारे यांचा प्रथमच विदर्भ दौरा आहे. येत्या १ मार्च रोजी त्या खामगावात येत असून येथील गांधी चौकात दुपारी ३ वाजता त्यांची जाहीर सभा होणार असून सुषमा अंधारे शिवसैनिकांना संबोधित करणार आहेत.
शिवसेनेते आमदारांनी गद्दारी केल्यानंतर एकनिष्ठ शिवसैनिकांचा पहिला मेळावा जाहीर सभेच्या निमित्ताने खामगावात होवू घातला असून या सभेसाठी सर्वांनी प्रयत्न करावेत. या जाहीर सभेला महिला आघाडी पदाधिकारी, सदस्या, तसेच शिवसैनिक व हजारो नागरीकांनी उपस्थित रहावे असे आवाहन शिवसेना महिला आघाडी उपशहर प्रमुख सौ. प्रेरणा शंकर खराडे यांनी केले आहे.
إرسال تعليق