महाशिवरात्री निमित्त महापूजा संपन्न



खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- १८ फेब्रुवारी रोजी महाशिवरात्री निमित्त परंपरेनुसार स्थानिक सुटाळा येथील राम मंदिर येथे स्थित भगवान शंकर यांच्या पिंडीचे विधिवत पूजन व आरती करून नारायण काका साहू यांच्या मार्गदर्शनात महाशिवरात्रीच्या पूजेला सुरुवात झाली, ही पूजा व अभीषेक रात्री १० ते सकाळी ६ पर्यंत निरंतर सुरू होता।मागील अनेक दशकांपासून नारायण काका साहू महाशिवरात्रीनिमित्त ही पूजा अर्चना करत असून आपल्या सनातन धर्माप्रती त्यांचे एक विशेष सात्विक प्रेम आहे, महाशिवरात्री च्या मध्यरात्री पूजेला अनन्य महत्व आहे ,तसेच शिवरात्री व कालरात्री ह्या दोन्ही रात्र जीवनात महत्त्वाच्या असतात असे  त्यांनी उपस्थित भक्तांना समजावून सांगितले। मागील अनेक वर्षापासून रवि जोशी हे त्यांच्या या महापूजेत मोठ्या भक्ती भावाने सामील होत असतात

Post a Comment

أحدث أقدم