खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- ऑल इंडिया काँग्रेस कमिटी चे महाराष्ट्र निरीक्षक म्हणून केरळचे श्री.रमेश चैणीथला गेली दोन दिवस महाराष्ट्र च्या दौऱ्यावर आहेत. पक्ष संघटन आणि अंतर्गत बाबी संदर्भात राज्यातील नेते, पदाधिकारी व कार्यकर्ते यांचेकडून चैनीथला यांनी वस्थूस्थिती जाणून घेतली.यावेळी टिळक भवन मुंबई येथे महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव (अजावि ) गौतम गवई यांनीही चैनीथला यांची भेट घेतली.
काँग्रेस मध्ये मागासवर्गीयाना सत्तेत पुरेसं प्रतिनिधित्व मिळावं याबाबत मांडणी केली. तसेच राज्यातील आंबेडकरी जनतेच्या काँग्रेस पक्षाकडून असलेल्या अपेक्षा गौतम गवई यांनी निरीक्षक चैनीथला यांचेशी बोलतांना व्यक्त केल्या. चर्चे दरम्यान जेष्ठ नेते अंबादास वानखडे डॉ. बाबासाहेब आंबेडकर सोशल फोरम विदर्भ संघटक हेही उपस्थित होते.
إرسال تعليق