सामाजिक कार्यकर्ते नरेश नागवानी यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रम

 सदैव सामाजिक कार्यामध्ये व्यस्त असलेले खामगाव येथील श्री. नरेशजी नागवाणी यांच्या वाढदिवसाचे औचीत्य साधुन विविध कार्यक्रमाचे आयोजन.


खामगांव जनोपचार न्यूज नेटवर्क :- येथील सामाजिक कार्यकर्ते सदैव सामाजिक कार्यात व्यस्त असणारे श्री. साईलिला ग्रामीण बहुउद्देशिय संस्थेचे अध्यक्ष श्री. नरेशजी नागवाणी ज्यांनी खामगांव शहरात फार्मसी सारख्या उच्च शिक्षणाचीसुविधा संस्थेव्दारे संचालित एनके कॉलेज ऑफ फार्मसी, अंत्रज ता. खामगांव येथे अत्याधुनीक सुविधा उपलब्धकरुन खामगांव शहराच्या शोभेमध्ये भर टाकुन त्यांच्या 48 व्या वाढदिवसानिमीत्त त्यांनी फार्मसी कॉलेजमध्येविद्यार्थ्यांना दिनांक 25 फेब्रुवारी 2023 रोजी फ्रेशरपार्टी व विविध सांस्कृतीक कार्यक्रमाचे आयोजन करुनदिल्यामुळे विद्यार्थ्यांनी आनंद व्यक्त केला


व त्यांच्या वाढदिवसानिमीत्त सामान्य रुग्णालय, खामगांव येथे दिनांक26फेब्रुवारी 2023 रोजी रक्तदान महायज्ञ करण्याचे स्वंयस्फुर्तीने एनके कॉलेज ऑफ फार्मसीच्या विद्यार्थ्यानीठरविले असुन दिनांक 26 फेब्रुवारी 2023 रोजी एनके कॉलेज ऑफ फार्मसी व एनके ज्युनियर कॉलेज,अंत्रजचे विद्यार्थी शिक्षणाचा भाग म्हणुन सामान्य रुग्णालय येथे भेट देउन रक्तदान करुन रक्दानमहायज्ञाबददल जनजागृती करुन गरजु रुग्णांना फळ वाटप कार्यक्रमाचे आयोजन करतील तसेच कॉलेजप्राचार्य डॉ. एन. एम. गवई, प्रा. शिखा अग्रवाल, सौ. पुनम पडोळे, प्रा. श्री भोजने व प्रा. तायडे विद्यार्थ्यांनामार्गदर्शन करतील.

Post a Comment

أحدث أقدم