श्री गजानन सेवा समिति द्वारे प्रगटदिना निमित्त दोन दिवस महाप्रसादाचे आयोजन
शेगाव(जनोपचार न्यूज नेटवर्क)-प्रगट दिन उत्सवा निमीत्य श्री गजानन सेवा समितीच्या वतीने संतनगरीत येणाऱ्या भाविकभक्तांसाठी १२ फेब्रूवारी व १३ फेब्रूवारी असे दोन दिवस अखंड स्थानिक अग्रसेन चौकातील मुरारका जिन येथे भव्य महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार असल्याची माहिती आयोजकांनी दिली आहे.
१३ फेब्रूवारी रोजी सोमवारी प्रगटदिन आहे. त्यानिमीत्ताने आदल्या दिवशी १२फेब्रूवारी रोजी सकाळी ६ वा.पासून महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. तसेच दुसर्या दिवशी १३ फेब्रूवारी रोजी प्रगट दिनाला सकाळपासून ६ पासून रात्री उशीरापर्यंत महाप्रसादाचे वितरण करण्यात येणार आहे. श्री गजानन सेवा समितीत शेगाव,नागपूर व अकोट येथील सेवेकरांचा सहभाग असतो.महाप्रसाद ग्रहण करण्यासाठी आलेल्या भाविकांची पादत्राणे सुरक्षित ठेवण्याची व्यवस्था सुध्दा समितीचे स्वयंसेवक करतात.या समितीकडून ऋषिपंचमी,प्रकट दिन व श्रीराम नवमी या महोत्सवाच्या वेळी महाप्रसाद वितरीत करण्यात येतो.श्री ग.म.संस्थानचा आदर्श या समितीच्या सेवेतून दिसून येतो,तिच स्वच्छता तिच शिस्त,तोच सेवाभाव, प्रगट दिनानिमित्त संतनगरीत येणाऱ्या भविकांनी, वारकरी मंडळी व दिंड्यांनी या महाप्रसादाचा अवश्य लाभ घ्यावा असे आवाहन आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे.
إرسال تعليق