सजनपुरी येथे हळदी कुंकू v तिळगुळ वाटप

 प्रेमभाव जोपासण्यासाठी हळदीकुंकू   अँड-  सौ मीरा बावस्कर



खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क

सजनपुरी येथे दिनांक 29 1 2023 रोजी दुपारी तीन वाजता सामाजिक सभागृह येथे श्रीराम बहुउद्देशीय सांस्कृतिक व क्रीडा मंडळ सजनपुरी यांच्यावतीने हळदी कुंकू तिळगुळ वाटपाचा कार्यक्रम घेण्यात आला महालक्ष्मी मातेच्या प्रतिमेला पुष्पगुच्छ हार अर्पण दीप प्रज्वलन करून कार्यक्रमाला सुरुवात झाली कार्यक्रमाचे अध्यक्षस्थानी एडवोकेट सौ मीरा बावस्कर प्रमुख उपस्थिती उपसरपंच सुमिता राऊत सदस्य सविता पाटील सुधाताई सातपुतळे होत्या कार्यक्रमात बोलताना मीरा बावस्कर यांनी महिलांचे हक्क अधिकार याविषयी कायदेविषयक माहिती दिली  त्यापुढे असेही म्हणाल्या की सामाजिक एकता  स्नेह प्रेमभाव जोपासण्यासाठी हळदी कुंकू तिळगुळ वाटप यासारखे सांस्कृतिक प्रतीकात्मक कार्यक्रम घेणे गरजेचे आहे संस्थेच्या सामाजिक कार्याचे त्यांनी कौतुक केले कार्यक्रमाच्या शेवटी उखाणे स्पर्धा घेण्यात आली कार्यक्रम यशस्वी करण्याकरिता सौ सुधाताई सातपुतळे शारदाताई भारसाकडे दुर्गा बुडुकले ज्योती हरणे मंदा पर्वते सुलभा सातपुतळे सोनल वाकोडे शिवानी पाटील  बहुसंख्य महिला उपस्थित होत्या आभार प्रदर्शन अर्पिता पाटील यांनी केले

Post a Comment

أحدث أقدم