खामगांव अर्बन बँक महिला शाखेचा "मकर संक्रांत" कार्यक्रम उत्साहात


खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क:- सहकार क्षेत्रात नांवलौकीक प्राप्त असलेली दि खामगांव अर्बन को-ऑप. बँकेच्यामहिला शाखेकडून भारतीय परंपरेत महत्वाचा सण समजला जाणारा "मकर संक्रांत" उत्सव मागिल ३७वर्षांपासून अविरत सुरु आहे. यावर्षी सुध्दा शुक्रवार दि. २० जानेवारी २०२३ रोजी बँकेच्या महिला शाखेतसंचालिका श्रीमती सुचेताताई हातेकर व सौ. फुलवंतीताई कोरडे यांच्या हस्ते दिप प्रज्वलन करुन,श्री सरस्वती वंदनेने कार्यक्रमाची सुरुवात झाली. याप्रसंगी जवळपास ३०० च्या वर मा. महिला सभासद,


खातेदारांना बँकेच्या महिला कर्मचाऱ्यांनी सौभाग्याचे लेणे हळदी कुंकू लावून, भेट वस्तु व तिळगुळ देवून स्वागत

करण्यात आले. या कार्यक्रमादरम्यान शाखेच्या पालक संचालिका श्रीमती सुचेता हातेकर यांनी

महिलांचे जीवनमान उंचावण्याकरीता व त्यांना आर्थिक पाठबळ देण्यासाठी अंत्योदय महिला बचत गट योजना,

स्त्री-शक्ती कर्ज योजना अतिशय माफक व्याज दरात सुरु असल्याबाबत उपस्थित सर्व महिलांना माहिती दिली

व महिलांनी नेहमीच आपले कुटूंब सांभाळून आपण कार्यरत असलेल्या क्षेत्रात सातत्याने कामगिरी करुन प्रगती

साधावी असे आवाहन केले. या प्रसंगी उपस्थित सर्व महिलांनी बँकेच्या या कार्यक्रमाचे कौतुक केले.

Post a Comment

أحدث أقدم