अमरावती पदवीधर मतदारसंघासाठी उद्या मतदा

२३ उमेदवार रिंगणात : सकाळी ८ वाजता होणार मतदानाला सुरवात



जनोपचार नेटवर्क

खामगाव : अमरावती विभाग पदवीधर मतदारसंघासाठी उद्या दि.३० जानेवारी रोजी निवडणूक होत असून सर्व तयारी पुर्ण झाली आहे. सकाळी ८ वाजता मतदानाला सुरवात होणार असून पदवीधर मतदारांमध्ये उत्साह दिसून येत आहे.

👆👆जाहिरात 👆👆
खामगाव येथील तहसील कार्यालया समोर उमेदवारांकडून बूथ लावण्यात आले आहेत. सकाळी ८ वाजता मतदानाला सुरवात होऊन दुपारी ४ पर्यंत ही प्रक्रिया चालणार आहे. या निवडणुकीत वंचित बहुजन आघाडीच्या उमेदवारामुळे यंदा उत्सुकता वाढली असून भाजपचे उमेदवार माजी मंत्री रणजित पाटील हॅट्रिक करणार की बदल घडणार हे पहावे लागणार आहे.

 अमरावती पदवीधर मतदारसंघात अमरावती यवतमाळ अकोला बुलढाणा वाशिम हे पाच जिल्हे येतात.  या निवडणुकीत भाजपा कडून डॉ. रणजीत पाटील, महाविकास आघाडी कडून धिरज लिंगाडे, वंचित बहुजन आघाडीकडून प्रा.अनिल अमलकार यांच्यासह २३ उमेदवार रिंगणात आहेत.   बुलडाणा जिल्ह्यात ५२ मतदान केंद्रांवर हे मतदान होणार आहे.  

जाहिरात

Post a Comment

أحدث أقدم