कचरा संकलन करणाऱ्या कंत्राटदारावर कारवाई करा!

 

माजी उपाध्यक्षांची मुख्याधिकारी यांच्याकडे तक्रार :पण कारवाही होते काय -सवालिया निशान
जनोपचार न्यूज नेटवर्क
खामगाव: गत काही महिन्यांपासून शहरातील कचरा उचल प्रक्रीया अतिशय संथगतीने सुरू आहे.  घंटागाडी कामगारांना अनियमित वेतनासोबतच घरोघरी जाऊन कचरा संकलनामध्येही खंड पडत आहे. त्यामुळे या कंत्राटदारावर कारवाई करण्यासंदर्भात माजी नगर पालिका उपाध्यक्ष संजयमुन्ना पुरवार यांनी मुख्याधिकाºयांकडे बुधवारी तक्रार केली आहे.
संग्रहित छायाचित्र


  माजी उपाध्यक्ष पुरवार यांनी मुख्याधिकाºयांकडे दिलेल्या तक्रारीत नमूद केले की, गतकाही दिवसांपासून रस्त्यावरील कचरा उचलला जात नाही. यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले असून शहर अस्वच्छता दिसत आहे. कचरा संकलनाकरीता ३३ आॅटो व २० टाटा एस अशा एकूण ५३ घंटागाड्या असून त्यावर ५३ चालक व ५३ हेल्पर असे एकूण १०६ कर्मचारी नेमण्यात आलेले आहेत, तसेच ५ टॅक्टर व त्यावर २५ कर्मचारी आहेत. मात्र नियमितपणे या सर्व घंटागाड्या व कर्मचारी कार्यरत राहत नाहीत, तसेच यातील काही घंटागाड्या नादुरुस्त झालेल्या आहेत. यामुळे कचरा संकलनाची समस्या निर्माण होत असून शहरात जागो-जागी कचºयाचे ढिग दिसून येतात. घंटागाडीचे लॉगबुक अपडेट नसून काम करणाºया कर्मचाºयांना किमान वेतन कायद्यानुसार वेतन देण्यात येत नाही. याविरोधात घंटागाडी कर्मचाºयांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार देखील केलेली आहे. त्याचप्रमाणे गेल्या काही महिन्यांपासून डंम्पिंग ग्राऊंडवर कचºययापासून खत निर्मिती देखील बंद आहे. त्यामुळे तेथे मोठया प्रमाणावर कचरा जमा होवून आग लागण्याच्या घटना वारंवार घडतात. याचा परिसरातील रहिवाशांना त्रास सहन करावा लागतो. हे सर्व कचरा संकलन करणाºया ठेकेदाराच्या मनमानी कार्यपध्दतीमुळे घडत आहे. त्यामुळे संबंधीत ठेकेदाराबर दंडात्मक कार्यवाही करुन त्याला समज देण्यात यावी तसेच जोपर्यंत घंटागाडी कर्मचा?्यांच्या सर्व समस्यांचे निराकरण,तसेच शहरातील कचरा संकलन यंत्रणा पुर्ण क्षमतेने कार्यरत होत नाही. तोपर्यंत संबंधीत ठेकेदाराला न.प.कडून कुठलेही देयक अदा करण्यात येवू नये, असेही तक्रारीत नमूद केले आहे.

Post a Comment

أحدث أقدم