ऑनलाईन चक्री जुगाराचा धुमाकूळ :कारवाईची मागणी
गडब (अवंतिका म्हात्रे) :- पेण शहरात चक्री जुगाराचा मायाजाळ पसरलेला असून ,अनेक जुगार वेडे तरुण यामध्ये गुरफटत चालले असून कडक कारवाई करण्याची मागणी जोर धरू लागली आहे .या चक्री जुगारामुळे अनेकांचे संसार उध्वस्त होण्याच्या मार्गावर आलेले आहेत .
पेण शहरातील बस स्थानकासमोर असलेला भाजीपाला मार्केट येथील नवीन वास्तूमध्ये चक्री जुगाराचा अड्डा राजरोसपणे सुरू असून, या ऑनलाइन जुगाराच्या व्यसनाने सध्याची तरुण पिढी बिघडत चालली आहे .
त्यामुळे भविष्यातील संभाव्य अनुचित प्रकार रोखण्यासाठी व कायदा सुव्यवस्था कायम टिकून ठेवण्याच्या दृष्टीने महाराष्ट्राचे पोलीस महासंचालक व रायगड जिल्ह्याचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घर्गे तसेच पेणचे पोलीस निरीक्षक देवेंद्र पोळ यांनी तातडीने सदरच्या ऑनलाइन चक्री जुगारावर कारवाईचे आदेश देऊन अवैद्य चक्री जुगार बंद करावा अशी मागणी पेणच्या नागरिकांकडून व महिला वर्गाकडून केली जात आहे .पोलीस कारवाईची नागरिकांना प्रतीक्षा आहे .
إرسال تعليق