लाचखोर घुगे acb च्या जाळ्यात

 ACB च्या कारवाही ला सलाम !

बुलडाणा उपजिल्हाधिकारी, लिपिक व एका वकिलाला एक लाखाची लाच स्वीकारतांना बुलडाणा एसीबीने केली अटक



खामगांव (janopchar news) .

      बुलडाणा जिल्ह्यातील जिगाव प्रकल्पात हिंगणा ईसापूर ता नांदुरा येथील एका शेतकऱ्याची जमीन गेली होती त्याचा मोबदला देण्याच्या नावाखाली बुलडाणा मध्यम प्रकल्प कार्यालयच्या उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे यांनी एकूण मोबदल्याचे 10 टक्के अर्थात 2 लाखाची मागणी केली होती व त्याला कार्यालयात कार्यरत लिपिक खरात यांनी प्रोत्साहन दिलं होतं. तसेच एड अनंता देशमुख यांनी मध्यस्थी केली होती. त्या शेतकऱ्याने याची तक्रार बुलडाणा एसीबी कडे केली असता आज 28 दिसेम्बर रोजी सापळा रचून मध्यम प्रकल्प कार्यालय परिसरात उपजिल्हाधिकारी भिकाजी घुगे,लिपिक नागेश खरात यांच्यासाठी 1 लाखाची लाचेची रक्कम स्वीकारतांना एड अनंता देशमुख यांना रंगेहात अटक करण्यात आले.या कारवाई नंतर पथकाने उपजिल्हाधिकारी घुगे, लिपिक खरात व एड देशमुख यांना ताब्यात घेतले. या कारवाईनंतर बुलढाणा जिल्हा महसूल प्रशासनात एकच खळबळ उडाली आहे.

विहिरीतून बाईक निघणे सुरूच...आज पर्यन्त किती निघाल्या जाणून घ्या खालील लिंक ओपन करून!


https://youtu.be/JLGbvlMfTn8

Post a Comment

أحدث أقدم