*गडब परिसरात भटक्या कुत्र्यांची दहशत*
गडब(जनोपचार):
गडब परिसरात मोकाट फिरणाऱ्या भटक्या कुत्र्यांची नागरिकांमध्ये मोठी दहशत निर्माण झाली आहे. टोळी टोळीने फिरणाऱ्या व रहदारीच्या रस्त्यावरच ठाण मांडून बसणाऱ्या या भटक्या कुत्र्यांमुळे नागरिकांना विशेषतः लहान मुले व महिलांना घराबाहेर पडणेही मुश्कील झाले आहे. त्यामुळे या मोकाट भटक्या कुत्र्यांचा ग्रामपंचायतीने ठोस उपाय योजनेद्वारे बंदोबस्त करावा अशी मागणी नागरिकांतून होत आहे.
दरम्यान दोन दिवसांपूर्वीच येथील गडब परिसरातील सामाजिक कार्यकर्ते मंगेश पाटील हे आपल्या चाळीजवळ गेलेले असतांना एका भटक्या कुत्र्याच्या हल्ल्यापासून तीन वर्षांच्या छोट्या मुलाला वाचवितांना या कुत्र्याने मंगेश पाटील यांच्यावरच हल्ला करुन त्यांच्या पायाला चावा घेतला. यात जखमी मंगेश पाटील यांच्यावर गडब प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार करून नंतर अलिबाग जिल्हा रुग्णालयात पुढील उपचार करण्यात आले.
शहरासह परिसरांत या मोकाट. भटक्या व पिसाळलेल्या कुत्र्यांची संख्या मोठ्या प्रमाणात वाढली आहे. या कुत्र्यांकडून गडब परिसरात लहान
मुले नागरिक यांच्यावर हल्ला चढवून त्यांना जखमी करण्याचे प्रकारही घडले आहेत.
याशिवाय गड जवळ असलेल्या पंचकृषी भागातही काही दिवसापूर्वी एका भटक्या कुत्र्याने अचानक केलेल्या हल्ल्यात ११ नागरिकांना जखमी केले होते.
शहरातील अनेक मुख्य रहदारीचे रस्ते, बाजारपेठ, मटण मामी बाजार, तसेच अनेक मोक्याच्या ठिकाणी से भटकी कुत्री मोठमोठ्या गटाने एकत्रितपणे उभी राहत असल्याने शाळेत जाणारी मुले बाजारात कामानिमित येणारे नागरिक, महिला, सकाळ-संध्याकाळी मोकळ्या हवेत फिरण्यास बाहेर पडणारे वयोवृध्द नागरिक या सर्वांना रस्त्यावरून चालताना या भटक्या कुत्र्यांच्या भीतीचे व दहशतीचे एक प्रकारचे मोठे दर्पण घेऊनच चालावे लागत आहे.
*गडब परिसरासह विभागातील कुत्रा चावलेले अनेक रुग्ण गेल्या काही दिवसांत गडब प्राथमिक आरोग्य केंद्रात आले आहेत. त्यांच्यावर येथे आवश्यक ते इंजेक्शनसह उपचार करण्यात आले आहेत. तर जखम खोलवर असलेल्या रुग्णांना उपचारासाठी अलिबाग येथे जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले* _वैदकिय अधिकारी प्रा.आ.केंद्र.गडब- पेण_*
إرسال تعليق