अडगाव येथे संविधान सप्ताह
खामगाव (जनोपचार) : तालुक्यातील अडगाव येथे संविधान दिनाचे औचित्य साधून संविधान सप्ताह प्रबोधनात्मक कार्यक्रमाने साजरा झाला.गावातील समस्त शाळकरी विद्यार्थी तसेच सर्व नागरिकांनी संविधानाने दिलेल्या हक्क अधिकाराची जाणीव व्हावी या करिता अनेक उपक्रम राबविले.त्याचाच एक भाग म्हणून खामगाव मध्ये स्पर्धा परीक्षा विश्वात नावाजलेले शाश्वत अकॅडमीचे सर्वेसर्वा प्रा.सागर वाकोडे यांनी अत्यंत सखोल मांडणी केली.सलग दोन दिवस सकाळच्या सत्रात त्यांनी राज्यघटनेचे महत्व विशद केले.देशाचे नागरिक म्हणून भारताला सविधांनाच्या अधिष्ठानावर संपूर्ण जगात नावलौकिकास पात्र ठरवायचे आहे.असे प्रतिपादन प्रा.सागर वाकोडे यांनी केले.प्रसंगी दोन्ही गावचे सरपंच,पोलीस,पाटील,गावातील नागरिकांसह विद्यार्थी उपस्थित होते.
إرسال تعليق