संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन महिला क्रिकेट स्पर्धाचे उदघाटन संपन्न
स्थानिक श्रीमती सुरज देवी रामचंद मोहता महिला महाविद्यालयाच्या वतीने दि.21 नोव्हेंबर ते 29 नोव्हेंबर संत गाडगेबाबा अमरावती विद्यापीठ आंतर महाविद्यालयीन महिला क्रिकेट झोन सी स्पर्धेचे यशस्वी उद्घाटन करण्यात आले .समारंभाचे अध्यक्षा महाविद्यालयाच्या प्राचार्य डॉ.स्वाती चांदे प्रमुख उपस्थित खामगाव क्रिकेट क्लब सदस्य श्री.राहुल साने ,विघ्नेश देशमुख, अभिनंदन सोनवणे ,त्याचप्रमाणे जी.एस. महाविद्यालयाचे प्रा. डॉ.डी.एस. वानखेडे ,प्रा. डॉ.सुनिल जाधव उपस्थित होते. पहिला सामना जी.एस. महाविद्यालय खामगाव विरुद्ध लद्दड कॉलेज ऑफ फार्मसी बुलढाणा यांच्यात झाला. यामध्ये जीएस महाविद्यालयाला विजयी घोषित करण्यात आले. यानंतरचा सामना श्रीमती. एस. आर .मोहता महिला महाविद्यालय खामगाव विरुद्ध जी.एस महाविद्यालय खामगाव यांच्या अत्यंत चुरशीचा झाला यात महिला महाविद्यालय उपविजयी तर जीएस महाविद्यालयाचा संघ विजयी झाले.स्पर्धा यशस्वी करण्यास खामगाव क्रिकेट क्लब त्याचप्रमाणे खामगाव वकील महासंघाचे अॅड. डी.व्ही देशमुख ,राहुल साने, आशुतोष राणा, विघ्नेश देशमुख ,अभिनंदन सोनवणे, यश मांडवेकर ,आनंद अंभोरे, पराग जोशी , तालुका क्रीडा अधिकारी श्री.यादव, सोनले सर,यांचे बहुमूल्य सहकार्य लाभले . स्पर्धेचे यशस्वी आयोजन महाविद्यालयाच्या खेळ व शारीरिक शिक्षण विभागाच्या वतीने प्रो.डाॅ.सीमा वि.देशमुख यांनी केले.
إرسال تعليق