खामगाव जनोपचार :- पोस्टे शिवाजी नगर येथील डी.बी. पथकाने देऊळगावराजा पो स्टे हद्दीतून चोरी गेलेली दुचाकी खामगाव येथे पकडली, पोलिसांनी नुसतं दुचाकीच नाही तर संशयित तरुनालाही ताब्यात घेतले आहे
या बाबत पोलिसांनी प्रेस नोट द्वारे दिलेल्या नाजीतीनुसार अंमलदार यांना गोपनीय खबर मिळाली होती की शुभम भोसले रा खामगाव हा त्याचे ताब्यात लाल व सिल्हर रंगाची स्लेंडर मोटार सायकल संशयीत रित्या घेवून हायवे रोडने जुगणु टी पॉइट कडुन तलाव रोड कडे जात आहे वरुन दोन पंच यांना बोलावुन त्यांना हकीकत समजावुन सांगुन NH-06 रोड वर जय भोले हॉटेल समोर रोडवर नाकाबंदी केली असता वर्णणाप्रमाणे शुभम मोटर सायकल घेवुन येतांना दिसला ददरम्यान पोलिसांनी त्याला थांबवून त्याचे नाव गाव विचारले त्याने त्याचे नाव शुभम भोसले वय 22 वर्ष रा. सति फैल खामगाव असे सांगीतले यावरुन त्याचे ताब्यात असलेल्या विनानंबर हिरो कंपनीची स्लेंडर आयस्मार्ट लाल व सिल्हर रंगाची मोटार सायकल बाबत पोलिसांनी विचारना केली असता त्याने उडवाउडविचे उत्तर दिले व त्यास मोटार सायकलचे कागदपत्र बाबत विचारणा केली असता त्याने कागदपत्रे नसल्याचे सांगीतले वरुन नमुद इसम हा संशयित रित्या मोटार सायकल ताब्यात ठेवुन स्वता चालवित असतांना मिळुन आला सदरची मोटार सायकल ही चोरीची असल्याची शक्यता असल्याने व त्याने सदर मोटार सायकल चे मालकी बाबत कोणतेही कागदपत्रे सादर केले नसल्याने त्यास मोटर सायकलसह ताब्यात घेवून मोटार सायकल बाबत कसून चौकशी कली असता सदर मोटर सायकल ही पो.स्टे. देऊळगांव राजा हद्दीतुन चोरी गेली असल्याचे समजले. वरुन पो.स्टे. देऊळगांव राजा येथे संपर्क करुन पो.स्टे. देऊळगांव राजा येथील पोलीसांचे ताब्यात नमुद इसमास व मोटार सायकलसह देण्यात आले आहे.
सदर कार्यवाही अशोक थोरात अपर पोलीस अधिक्षक, खामगाव व उपविभागीय पोलीस अधिकारी, खामगाव. अमोल कोळी सा यांचे मार्गदर्शनाखाली पो.स्टे. शिवाजी नगर पो.नि. अरुण परदेशी सा. गुन्हे शोध पथकातील सहा.पो.नि रविंद्र लांडे, पो.हे.कॉ. निलसिंग चव्हाण ,पो.ना. देवेंद्र शेळके ,पो.ना. संदीप टाकसाळ ,पो.ना. सागर भगत, व पो.कॉ रविंद्र कन्नर यांनी केली आहे.
إرسال تعليق