धनंजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमाचे आयोजन सामान्य रुग्णालय खामगाव येथे फळवाटप तर घारोड येथे भव्य रोगनिदान शिबिराचे आयोजन
खामगाव(जनोपचार) महाराष्ट्र प्रदेशचे काँग्रेस सचिव तथा अकोला जिल्हा कॉंग्रेस प्रभारी धनंजय देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त 21 ऑक्टोंबर रोजी खामगाव शहर व तालुक्यात विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे यामध्ये 21 ऑक्टोंबर रोजी सकाळी 9 वा सामान्य रुग्णालयात महात्मा ज्योतीबा फुले यांच्या पुतळ्याला अभिवादन करून माल्यार्पण त्यानंतर रुग्णांना फळवाटप करण्यात येईल सकाळी 10 वाजता खामगाव तालुक्यातील घारोड येथे गोदावरी फाउंडेशन मेडिकल कॉलेज जळगावखान्देश एस वाय ग्रुप शाहू फुले आंबेडकर फाउंडेशन व यांच्या संयुक्त वतीने घारोड येथे भव्य रोगनिदान महाशिबिर आयोजित करण्यात आले आहे या शिबिराचे उद्घाटन रावेर लोकसभा मतदारसंघाचे माजी खासदार व गोदावरी फाउंडेशनचे अध्यक्ष डॉ उल्हास पाटील यांच्या हस्ते होईल या शिबिरामध्ये मधुमेह, आतड्याची त्रास ,किडनी,ई सीजी,टू डी इको यासह विविध रोगांच्या तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत , याचा लाभ घेण्याचे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे
ह्या वेळेस देऊ शकता शुभेच्छा
तसेच १२ते ५ ह्या वेळेत मा श्री धनंजय देशमुख हे सर्वांच्या शुभेच्छा स्वीकारण्यासाठी आपल्या निवासस्थानी उपलब्ध असतील
إرسال تعليق