जनोपचार संपर्क नितेश मानकर खामगाव 8208819438
बुलडाणा (जनोपचार)आपण खासदार झाल्यानंतरच खामगाव-जालना रेल्वे मार्गाच्या प्रश्नाला चालना मिळाली आहे. नाहीतर हा विषय फक्त मागणी पुरताच होता. प्राथमिक सर्वेक्षणात रेट ऑफ रिकव्हरीचा सर्वे झाली होती. त्यावेळी ४.२ रिकव्हरी म्हणजे सर्वेत तोट्याचा मार्ग होता. त्यामुळे आपण आर्थिक दृष्टया सर्वे करण्याची मागणी केली. ही मागणी मंजूर झाली अन् दोन जणांची टीम सर्वे करण्यासाठी जालना व बुलडाण्यात दाखल झाली. या टीम सोबत आपण दोन दिवस होतो. या टीमने पाठवलेला अहवाल सकारात्मक होता. त्यामुळे तीन कोटी ६७ लाख ५० हजार रुपयांचा डीपीआरमंजुर झाला आहे, अशी माहिती केंद्रीय ग्राम विकास समितीचे अध्यक्ष खा. प्रतापराव जाधव यांनी दिली.
रेल्वेमंत्री रावसाहेब दानवे यांनी खामगाव-जालना रेल्वे मार्गाबाबत केलेल्या विधानानंतर आज खा. प्रतापराव जाधव यांनी पत्रकार परिषद बोलावली होती. यावेळी त्यांनी रेल्वेमंत्री दानवे यांचे विधान हे भाषणातील असून ते मीडियाद्वारे पोहोचवण्यात आले असल्याचे सांगून त्यांनी आपल्या मतदार संघाबाबत बोलणे गैर नसल्याचे सांगत खा. जाधव यांनी त्यांचे वक्तव्याचा निषेध करणार नसल्याचे स्पष्ट केले. यावेळी ते म्हणाले की, बुलडाण्यात दाखल झालेल्या टीमने मालवाहू व प्रवासी वाहतुकीचा सर्वे केला. चिखली, मेहकर, खामगाव, शेगावचा अभ्यास केला. सर्वेतून हा रस्ता फायद्याचा असल्यास अहवाल आला. या अहवालानंतर पाठपुरावा केला. डीपीआर तयार करण्याचा पाठपुरावा आपण केला. आता कोणती लाईन फायद्याची राहील याचे सर्वेक्षण केले व अंतिम लाइन तयार झाली आहे. या संदर्भात रेल्वे उपअभियंता राजेश नगराळे यांच्याशी माझे बोलणे झाले. त्यांचे मार्गदर्शनाखाली रेल्वेचे काम सुरु आहे. डीपी आर रेल्वे बोर्डाकडे सादर केल्या जाणार आहे.
या खर्चाचा भार राज्याला सुध्दा उचलावा लागेल. त्यासाठी माजी मुख्यमंत्री व नवीन मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबतही चर्चा झाली आहे. बुलेट ट्रेनही जिल्ह्यातून जाणार पण, जिल्ह्याच्या ठिकाणांवरुन जाईल, हे सांगता येत नाही. या मार्गावर सोळा स्टेशन असून जालना, कचरेवाडी, रणमुर्ती, न्हावा हे जालना जिल्हयातील तर बुलडाणा जिल्हयातील देऊळगाव राजा, सिंदखेड राजा, जळगाव रोड, देऊळगाव मही, अंढेरा, मेरा खुर्द, दहीगाव, अमडापुर, उदयनगर, पाळा, जळका तेली, नवीन खामगाव हे स्टेशन राहणार आहेत.
إرسال تعليق