प्यार मे धोका:आणि तिने प्रियकराच्या डोळ्याला पट्टी बांधून केला वार ...
जनोपचार न्यूज :- प्रियकराच्या डोळ्यांवर पट्टी बांधून प्रेयसीनेच कोयत्याने हल्ला चढवला. त्यामुळे प्रियकर मृत्यूशी झुंज देत आहे. आधीच्या प्रियकराच्या सांगण्यावरून दुसऱ्या प्रियकराचा काटा काढण्यासाठी तिने हे कृत्य केल्याचे समोर आले आहे. ही घटना २७ ओक्टॉम्बर रोजी भंडारा तालुक्यातील झिरी देवस्थानाच्या टेकडीवर घडली. दरम्यान जवाहरनगर पोलिसांनी प्रेयसी व तिच्या दुसऱ्या प्रियकराविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
गोकूळ नामदेव वंजारी (२२, रा भंडारा) असे जखमी प्रियकराचे नाव आहे. मिळालेल्या माहिती नुसार भंडारा तालुक्यातील एका १७ वर्षीय मुलीचे २४ वर्षीय नीरज पडोळे याच्यासोबत चार वर्षांपासून प्रेम प्रकरण सुरू होते.
त्यात गोकूळची एंट्री झाली. पाच ते सहा महिन्यांपासून त्यांचे
प्रेमप्रकरण सुरू झाले. नीरजची साथ सोड आणि आता पूर्णपणे माझीच राहा, असे गोकूळने तिला सांगितले. तिने ही माहिती पहिला प्रियकर नीरजला दिली. त्यानंतर दोघांनी गोकूळचाच काटा काढण्याचा निर्णय घेतला.यासाठी त्याला झिरी देवस्थानच्या टेकडीवर बोलाविण्याचा निर्णय घेतला. ठरल्या प्रमाणे गोकूळला तिने नांदोरा झिरीवर ये. तिथे तुला सरप्राइज गिफ्ट देते, असे सांगितले. त्यामुळे गोकूळ तिला भेटायला झिरी देवस्थानच्या टेकडीवर आला.
तिथे गेल्यावर तिने तुझ्यासाठी गिफ्ट आणले आहे. प्रथम तू
डोळे बंद कर, असे म्हटले. त्यानंतर तिने त्याच्या डोळ्यांवर
पट्टी बांधली. स्कार्फच्या साह्याने दोन्ही हात मागे करून
बांधले. त्याचवेळी प्रेयसीने आपल्याजवळील धारदार
कोयत्याने त्याच्या डोक्यावर वार केला. गोकूळ कसाबसा
डोळ्याची पट्टी काढून आयुध निर्माणी परिसरात धावत
सुटला. परिसरातील नागरिकांनी त्याच्या मदतीला धावत
जवाहरनगर पोलीस ठाण्यात आणले. त्यानंतर त्याला
उपचारासाठी रुग्णालयात दाखल करण्यात आले. पोलिसांनी
प्रेयसी व नीरजविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. तपास
प्रभारी ठाणेदार सुशांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू
आहे. पोलिसांनी प्रेयसी व नीरजला ताब्यात घेतले आहे.
إرسال تعليق