तरुण उठला तिरडी वरून .....

 या घटनेला वाचून तुम्ही आश्चर्यात पडाल कारण तिरडी वरील तरुण अचानक जिवंत झाला आणि पसरली चर्चा ......


अकोला जिल्हातील पातुर तालुक्यातील विवरा या गावात मृत्यू झालेल्या युवकाला जीवनदान मिळाल्याची अंधश्रद्धेला वाव देणारी धक्कादायक घटना घडल्याने परिसरातील नागरिकांना आश्चर्याचा धक्काच बसलाय प्रशांत मेसरे अस या युवकाच नाव आहे.मिळालेल्या माहितीनुसार प्रशांत हा काही दिवसांपासून आजाराने त्रस्त होता तर त्याच उपचार डॉक्टरांकडे सुरू होता सोबतच त्याचा उपचार गावातील एका बाबा कडे सुद्धा सुरू होता… प्रशांत हा चांदणी पोलीस स्टेशनला होमगार्ड म्हणून सुद्धा कार्यरत होता.. काल दुपारी प्रशांतने हालचाली बंद केल्या त्यामुळे त्याचा मृत्यू झाला असल्याचा त्याच्या घरच्यांनी सांगितलं.. त्याच्या घरी लोकांची गर्दी झाली आणि गावात शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्काराची तयारी सुरु केली.तिरडी बांधून सरणाकडे नेत असतांना काही लोकांनी प्रशांतला गावातील बाबाकडे नेण्यात आलं त्यानंतर बाबांनी मंत्र उपचार सुरू केले आणि काही वेळात प्रशांत उठून बसला. यानंतर बाबाजींनी चमत्कार करून प्रशांतला जिवंत केलं अशी गावात चर्चा पसरली.


या घटनेची माहिती मिळताच चान्नी पोलिसांनी प्रशांत त्याच्या घरच्यांसह बाबांना पोलीस स्टेशनला नेलं आणि त्यांना डॉक्टरांनी प्रशांतला मृत घोषित केलं याचा पुरावा मागितला असता ते पुरावा सादर करू शकले नाही. पोलिसांनी याप्रकरणी प्रशांत आणि इतर लोकांवर गुन्हे दाखल होणार आहेत असे कळते, उल्लेखनीय म्हणजे खामगाव मधील लाईफ लाईन मध्ये त्याची काहीशी तपासणी करण्यात आल्याची माहिती आहे

                                                 


साभार महाव्हाईस

Post a Comment

أحدث أقدم