मी बापडा हमाल भार वाही !
काल माझ्या वाढिवसानिमीत्त अनेकांनी प्रत्यक्ष भेटून, फोन करून, एसएमएस, व्हाट्सअप, फेसबुक,मॅसेजर सोशल मीडियाच्या माध्यमातून पोस्ट टाकून वाढदिवसाच्या शुभेच्छा दील्या. तुमच्या पाठबळाच्या आशीर्वादाच्या सदिच्छा शुभेच्छांच्या बळावर मी आजवर माझ्या राजकीय सामाजिक व पत्रकारितेच्या क्षेत्रातील जबाबदारी यशस्वी रित्या सांभाळू शकलो आहे तुमचे हे प्रेम मला दिवसेंदिवस उत्कृष्ट सामाजिक कार्य करण्यास कायम बळ देत राहते.आपण मला दिलेल्या शुभेच्छा ह्या तुमचे माझ्यावर असलेल्या प्रेमासोबत पुढील जीवनात आणखी उत्कृष्ट सामजिक सेवकर्या करण्याची प्रेरणा देऊन समजिक कार्याची जवाबदारी ही वाढल्याची जाणीव करुन देत होत्या तुमच्या शुभेच्यांच्या भावना समजून घेत कायम तुमच्या प्रेमाच्या शुभेच्छारुपी आशीर्वादाच्या छत्रछायेत रहात आपना सर्वांना सांगु इच्छितो की मी बापडा हमाल भारवाही... मी माझ्या पुढील जीवनात तूम्ही माझ्यावर केलेल्या प्रेमाला व माझ्यावर ठेवलेल्या विश्वासाला कधीच तडा जाऊ देणार नाही व मी अधिक जोमाने माझे सुरु असलेले समाजकार्य करीत राहील. आणखी तुमच्या प्रेमाला विश्वासाला पात्र होण्याची शक्ती आई तुळजा भवानी मला देवो हिच आई तुळजा भवानी चरणी प्रार्थना व आपल्या सर्वांचे मना पासून खूप खूप आभार व धन्यवाद!* *आभार व धन्यवादकर्ता आपल्या हक्काचा आपला माणूस 🙏किशोर आप्पा भोसले🙏 खामगाव*
إرسال تعليق