पेणकरांचा महामार्गावर रास्तारोको ...
अन पंधरा दिवसांत खड्डे भरण्याचे आश्वासन!!
गडब- (अवंतिका म्हात्रे) बारा वर्षांपासून रखडलेल्या मुंबई-गोवा महामार्गाचे काम जलद गतीने व्हावे आणि महामार्गावर पडलेले खड्डे कायमस्वरुपी भरले जावे याकरिता रविवारी माझं पेण या टॅगलाईन खाली एकत्र येत अर्धा तास मुंबई गोवा महामार्ग रोखून धरण्यात आला.
आंदोलनात तालुक्यातील विविध सामाजिक, वाहतूक संघटना आणि राजकीय पक्षांच्या कार्यकर्त्यांनी सहभाग घेतला. यावेळी येत्या पंधरा दिवसात खारपाडा ते कोलेटी या पेण तालुक्यातील महामार्गावरील सर्व खड्डे कायमस्वरुपी भरण्याचे लेखी आश्वासन देण्यात आले. शिवाय लवकरच या टप्प्याचे
रस्त्यावर यमराज
आंदोलनादरम्यान दस्तूरखुद्द यमच रस्त्यावर अवतरलेला सर्वांनी पाहिले. तो वाहनचालकांना वाहने सावकाश हाका असे आवाहन करीत होता. या आंदोलनामुळे वाहनांच्या रांगा लागल्या होत्या.सिमेंट काँक्रीटीकरण करुन महामार्ग भक्कम स्थितीत करण्यात येईल आणि त्यासाठी जवळपास २३९ कोटी रुपये मंजूर झाले असल्याचे राष्ट्रीय महामार्ग कार्यालयाच्या अधिकाऱ्यांनी चर्चे दरम्यान सांगितले. शांतता व सुव्यवस्था राखण्याच्या दृष्टीने पेण पोलीस ठाणे, दादर पोलीस ठाणे, वडखळ पोलीस ठाणे, नागोठणे पोलीस ठाणे, पोयनाड पोलीस ठाणे या पाच पोलीस ठाणे मिळून शंभर कर्मचारी व पंधरा अधिकारी घटनास्थळी उपस्थित होते.
إرسال تعليق