गुंजकर कॉलेजचा विद्यार्थी अनुप चिमकरची आयआयटी भरारी
खामगाव- प्राध्यापक रामकृष्ण गुंजकर सरांच्या गुंजकर एज्युकेशन हबचे विद्यार्थी शैक्षणिक क्षेत्रात नवनवीन यशाची शिखरं गाठत आहेत. दरम्यान गुंजकर कॉलेजचा विद्यार्थी अनुप विजय चिमकर याने मोठी भरारी घेतली असून त्याचा आयआयटी खडकपूर केमिकल इंजीनियरिंगला नंबर लागला आहे.
गुंजकर एज्युकेशन हबने शैक्षणिक क्षेत्रात आपला वेगळा ठसा उमटवला आहे. गुंजकर क्लासेस प्रमाणेच गुंजकर कॉलेज व जिजाऊ स्कुल ऑफ स्कॉलरने ही गुणवत्ता पूर्ण शिक्षणाची परंपरा कायम राखली आहे. दर्जेदार शिक्षण आधुनिक शिक्षण प्रणाली यामुळे गुंजकर एज्युकेश हब कडे विद्यार्थ्यांचा ओढा वाढत चालला आहे. गुंजकर एज्युकेशन हबचे विद्यार्थी यशाची नवनवीन शिखर गाठत असून नुकतेच गुंजकर कॉलेजचा विद्यार्थी अनुप विजय चिमकर याने सर्वात अवघड असलेल्या आयआयटी सारख्या परीक्षेत घवघवीत यश संपादन करून त्याचा आयआयटी खडकपूरला केमिकल इंजिनिअरिंगला नंबर लागला आहे. त्यामुळे सर्व स्तरातून अनुप वर अभिनंदनचा वर्षाव होत आहे. अनूप आपल्या यशाचे श्रेय आई वडील व शिक्षकांना देतो.
त्याच प्रमाणे यावर्षीच्या JEE मेन परीक्षेत गुंजकर एज्युकेशन हबच्या विद्यार्थ्यांनी मोठे यश प्राप्त केले होते. अकोला, नांदेड पेक्षाही चांगला निकाल खामगावमध्ये गुंजकर एज्युकेश हबने दिला होता. दरवर्षी प्रमाणे यावर्षीही गुंजकर कोचिंग क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी JEE मेनच्या सेशनवन परीक्षेत उत्तम यश प्राप्त केले होते. गुंजकर कोचिंग क्लासेसचे विद्यार्थी अगस्त्य पुरुषोत्तम नारायण याने ९८.५५ टक्के, अनुप विजय चिमकर याने ९६.५७ टक्के, आणि स्वरूप विजय नारखेडे याने ९६.३९ टक्के गुण प्राप्त केले आहेत. तसेच मागील वर्षी गुंजकर कोचिंग क्लासेसचा विद्यार्थी नीरज राऊत याने NEET परीक्षेत 591 गुण मिळविले होते. त्यामुळे त्याचा शासकीय मेडिकल कॉलेजला नंबर लागलेला आहे. तसेच कुंदन राजेंद्र पवार यानेही चांगले गुण मिळविल्याने त्याचा एमबीबीएस करिता गव्हर्मेंट कॉलेज अमरावती येथे नंबर लागलेला आहे. त्याच प्रमाणे मयूर वाकुडकर याचा एमबीबीएस साठी गव्हर्नमेंट मेडिकल कॉलेज अकोला येथे नंबर लागलेला आहे.
إرسال تعليق