दत्ताजींनी लावलेल्या रोपट्याचं आज वटवृक्ष झाला -बाळासाहेब काळे.
जनोपचार खामगाव
स्थानिक खामगांव अर्बन बँक च्या दिनदयाल सभागृहात स्व दत्ताजी डीडोळकर स्मृती दिना निमित्त अखिल भारतीय विद्यार्थी परिषद व स्व दत्ताजी डीडोळकर जन्मशताब्दी आयोजन समितीच्या वतीने व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. प्रमुख वक्ते रा.स्वंयंसेवक संघाचे माननीय जिल्हा संघचालक बाळासाहेब काळे यांनी स्व दत्ताजी डीडोळकर यांच्या जीवनावर प्रकाश टाकुन अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेचे लावलेल्या रोपट्याचं आज खूप मोठा वटवृक्ष झाला आहे असे मनोगत यावेळी व्यक्त केले.यावेळी मंचावर समारोहाचे अध्यक्ष खामगांव अर्बन बँकेचे अध्यक्ष आशिष चौबिसा, प्रमुख वक्ते मा.जिल्हासंघचालक बाळासाहेब काळे, अभाविप जिल्हा प्रमुख तथा आयोजन समितीचे जिल्हाप्रमुख गणेश घोराळे, अभाविप खामगांव शाखेचे अध्यक्ष प्रा.सुनिल मुळे उपस्थित होते.प्रास्ताविकातुन गणेश घोराळे यांनी स्व.दत्ताजी डीडोळकर जन्मशताब्दी वर्षानिमित्त आगामी वर्षात घेण्यात येणाऱ्या कार्यक्रमाची माहिती दिली.अध्यक्ष स्थानावरून आषिश चौबिसा यांनी ही स्व.दत्ताजी डीडोळकर यांच्या संघ कार्यात केलेल्या संघर्षाची स्मृती जागृत करून बुलढाणा जिल्ह्यात जन्मलेल्या दत्ताजी डीडोळकर यांचा जन्मशताब्दी महोत्सव नागपूरकरांच्या तोडीसतोड विविध कार्यक्रम आपल्या जिल्ह्यात घेऊन जन्मशताब्दी वर्ष साजरे करण्याचे आवाहन त्यांनी केले.सदर व्याख्यानात वैयक्तिक गीत जिग्नेश कमानी यांनी गायिले तर
संचालन नंदेश्वर चोपडे, आभार प्रा.सुनिल मुळे यांनी मानले.
कार्यक्रमाची सांगता सौ श्यामली कुळकर्णी यांनी गायलेल्या वंदेमातरम गीताने झाली. सदर कार्यक्रमास रास्वंसंघाचे अधिकारी गण, खामगांव अर्बन बँक , अभाविप चे सदस्य,जी वी मेहता नवयुग विद्यालय व सरस्वती विद्यामंदिर चे शिक्षक, कर्मचारी उपस्थित होते.
إرسال تعليق