श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्र न्यास अयोध्याचे कोषाध्यक्ष प.पू.स्वामी श्री गोविंददेव गिरीजी महाराज यांची कामगार मंत्री नामदार ॲड आकाश फुंडकर यांच्या निवासस्थानी सदिच्छा भेट

श्रीराम जन्मभूमी तिर्थक्षेत्र न्यास अयोध्याचे कोषाध्यक्ष प.पू.स्वामी श्री गोविंददेव गिरीजी महाराज यांचे आज खामगांव येथे आगमन झाले. या प्रसंगी त्यांनी खामगांव विधानसभा मतदार संघाचे आमदार ॲड आकाशदादा फुंडकर यांचे  वसुंधरा, निवासस्थानी सदिच्छा भेट दिली.  

जाहिरात

जगभरातील तमाम हिंदुचे आराध्य प्रभू श्रीराम यांचे जन्मभूमी श्री राम लल्ला मंदीराचे स्वप्न ५०० वर्षानंतर पुर्ण झाले या जगभरातील प्रसिध्द अशा प्रभु श्रीराम जन्मभूमी ‍ तिर्थक्षेत्र न्यास अयोध्याचे कोषाध्यक्ष प.पू.स्वामी श्री गोविंददेव गिरीजी महाराज यांनी खामगांव आगमन प्रसंगी ना ॲड आकाश फुंडकर यांच्या वसुंधरा निवास स्थानी सदिच्छा भेट दिली. यावेळी आगमन प्रसंगी श्री सागरदादा फुंडकर यांनी पुष्पहार घालून व चरणस्पर्श करुन आशिर्वाद घेतले.  



यानंतर प.पू.स्वामी श्री गोविंददेव गिरीजी महाराज यांनी लोकनेते स्व.भाऊसाहेब फुंडकर यांचे प्रतिमेस माल्यार्पण करुन प्रभु श्रीराम नामाची शाल देखील अर्पण केली.  वसुंधरा निवासस्थानी ना आकाश फुंडकरांनी प.पू.स्वामी श्री गोविंददेव गिरीजी महाराज यांना पुष्पहार घालून व चरण स्पर्श करुन आशिर्वाद घेतले.  धार्मिक विषयावर ना.ॲड आकाशदादा फुंडकर यांच्याशी चर्चा केली. राम जन्मभूमी न्यासाबददल चर्चा करण्यात आली व सदैव धार्मिक कार्यात अग्रेसर राहण्याबाबत संदेश ‍प.पू.स्वामी श्री गोविंददेव गिरीजी महाराज यांनी यावेळी दिल्या.

Post a Comment

أحدث أقدم