जिगाव प्रकल्प कामात भ्रष्टाचार ?
छावा जिल्हा प्रमुख विजय इंगळे चौकशीची मागणी
खामगाव :जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यात पूर्णत्वास येत असलेल्या जिगाव प्रकल्पाच्या कामात भ्रष्टाचार झाला असून या भ्रष्टाचाराची राज्यस्तरीय तांत्रिक दक्षता समितीकडून चौकशी करण्यात यावी, अशी विनंती वजा तक्रार छावा संघटनेचे जिल्हाप्रमुख विजय नामदेवराव इंगळे यांनी मुख्यमंत्री यांच्यासह जलसंपदा मंत्री मदत पुनर्वसन, पाणीपुरवठा या इतर विभागा१ च्या मंत्र्यांकडे १७ एप्रिल रोजी केली आहे.जिगाव प्रकल्पाला सन ९५ -९६ मध्ये मान्यता मिळाली असून या प्रकल्पाची किंमत ३ हजाराहून ३३ हजार कोटीवर पोहोचली आहे. या प्रकल्पाच्या कामातील जलरोधक कामावर ७०० ते ८०० कोटी खर्च झाला आहे. विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर ३५०० कोटी करण्याची आवश्यकता होती का? यामध्ये आचारसंहिता भंग झाली नाही का? असा प्रश्न उपस्थित करण्यात आला आहे.
पुनर्वसनासाठी गावठाणावर १०० ते १५० कोटी खर्च करून कामाच्या दर्जाच्या तक्रारी झाल्या आहे. अधिक्षक अभियंता यांचे कार्यालय जिल्ह्याच्या ठिकाणी असतांना देखील शेगाव येथे परत अधिक्षक अभियंता कार्यालयाची आवश्यकता होती का? वर्ग १ व वर्ग २ अधिकाऱ्यांची दहा वर्षापासून जिल्ह्याबाहेर बदली का नाही, असे अनेक मुद्दे उपस्थित करून या प्रकल्पातील सर्व महत्वाच्या बाबी सीएजीद्वारे तपासणी करावी.
या सर्व मुद्यांची जातीने लक्ष देवून योग्य ती कारवाई करावी अन्यथा रस्त्यावर आंदोलन उभारावे लागेल, असेही विजय इंगळे यांनी दिलेल्या तक्रारीत नमूद केले आहे.
إرسال تعليق