स्वतःच्या मुलाने बापा ची केली हत्या
हत्येच कारण अस्पष्ट... डीवायएसपी प्रदीप पाटील यांच्यासह पोलीस पथक घटनास्थळी दाखल
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: तालुक्यातील लोणी गुरव येथे रानात गेलेल्या जावयाच्या कुटुंबातील मुलानेच पित्याची हत्या केल्याची घटना आज सकाळी उघडकीस आली. मृतकाच्या अंगावर असलेल्या घावावरून असे निदर्शनास येते की त्याचा निर्घुण खून करण्यात आला. पुढच्या मुलाने बापाचा खून केल्याचे पोलीस तपासात समोर आले आहे.
प्राप्त माहितीनसार मूळ बोधा काजी येथील गोरख हिवराळे हे गेल्या काही वर्षांपासून सासर लोणी गुरव येथे वास्तव्यास गेले होते. दरम्यान आज सकाळी त्यांचा मृतदेह लोणी गुरव येथे आढळला. घटनेची माहिती मिळताच खामगाव ग्रामीण पोलीस तसेच विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी प्रदीप पाटील हे तात्काळ घटनास्थळी दाखल झाले व तपास कार्य सुरू केले. खुनाचे नेमके कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी पोलिसांनी या प्रकरणात तिघाची विचारपूस केल्याची माहिती मिळत आहे.
إرسال تعليق