रस्त्यावरील ढिगारामुळे नागरिकांना त्रास
ठेकेदाराचं "काम सरो..." धोरण?
खामगाव जनोपचार न्यूज नेटवर्क: - रस्त्याचे काम पूर्ण झाले मात्र रस्त्यावर असलेला ढीग अजून हटविण्यात आला नाही त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे. स्थानिक बोबडे कॉलनी जवळील समर्थ नगर येथे काही दिवसापूर्वी रस्त्याचे काम पूर्णत्वास आले. रस्त्याच्या कॉलिटी वर अनेकांनी संशय व्यक्त केला आहे. तद्वतच या रस्त्यावर सलेल्या ढिगार्याबद्दलही तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कॉन्ट्रॅक्टर ने काम झाल्यानंतर हा ढिगारा जैसे थे ठेवल्यामुळे "काम सरो...."असे ठेकेदाराबाबत बोलल्या जात आहे. सदर ढिगारा उचलण्यात यावा अशी मागणी या भागातील नागरिक करीत आहेत.
إرسال تعليق