रमाई आवास योजना: शहरी नवीन घरकुल मंजुरीसाठी व पोर्टल सेवा

नगर परिषद खामगाांव रमाई आवास योजना (शहरी) खामगाांव नगर परिषद हद्दीमधील सर्व अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील लाभार्थ्यांना कळविण्यात येते की, रमाई आवास योजना (शहरी) अंतर्गत नवीन घरकुल मंजुरी करीता वेब पोर्टल

(https://khamgaon.ramaiawas.com/index) वर इच्छुक लाभार्थ्यांनी सी.एस.सी. सेंटर वर ऑनलाईन नोंदनी करावी.  

पात्रता :- 1) अनुसूचित जाती व नवबौध्द घटकातील लाभार्थी. 

2) लाभार्थ्यांने कोणत्याही शासकीय घरकुल योजनेचा लाभ घेतलेला नसावा. 3) अर्ज आधी भरला असेल तर पुन्हा अर्ज भरू शकत नाही.  

रमाई घरकुल नोंदनी ऑनलाईन करण्याकरीता आवश्यक कागदपत्रे :- 

1) BPL प्रमाणपत्र असल्यास 2) जातीचा दाखला (SDO/तहसीलदार)/Validity Certificate) 3) घर टॅक्स पावती अर्जदाराच्या नावाची 4) असेसमेंट कॉपी अर्जदाराच्या नावाची5) उत्पन्न दाखला चालू वर्ष 6) रहीवाशी दाखला  नगरसेवक7) रेशन कार्ड मध्ये नाव असणे आवश्यक 8) १०० रू. मुद्रांक पेपर वर प्रतिज्ञा लेख 9) आधार कार्ड/ मतदान कार्ड 10) विधवा असल्यास पतिचा मृत्यु दाखला 11) ७/१२ किंवा नमुना ड 12) बँक पासबुक झेरॉक्स प्रत  13) पुरग्रस्त असल्यास दाखला 14) पीडित असल्यास दाखला (Atrocity) 15) सध्या स्थितीत घराचा / जागेचा फोटो 16) अतिक्रमित जागा असल्यास १९९५ चा पुरावा.. जसे इलेक्ट्रिक बिल, रेशन कार्ड, असेसमेंट, टॅक्स पावती, मतदान कार्ड. यापैकी एक. संपूर्ण कागदपत्राच्या मुळ प्रती सह ऑनलाईन नोंदनी करुन रमाई आवास योजना (शहरी) योजनेमध्ये 2,50,000/- रुपये निधीचा लाभ घेण्याकरीता नगर परिषद मार्फत आवाहन करण्यात येत आहे. (https://khamgaon.ramaiawas.com/index) याबाबतीत अधिक माहिती करिता DAY- NULM रमाई आवास योजना कक्ष येथे संपर्क साधावा. 

                                       डॉ.प्रशांत शेळके 

मुख्याधिकारी तथा प्रशासक, नगर परिषद, खामगाव

Post a Comment

أحدث أقدم