संस्कार भारती चा पाडवा पहाट रविवारी ३० मार्च २०२५ रोजी

खामगाव:- दरवर्षी प्रमाणे याहीवर्षी हिंदू नववर्षाचे उत्साहात व जल्लोषात स्वागत करण्यासाठी संस्कार भारती बुलढाणा जिल्हा, टिळक स्मारक महिला मंडळ, दि.खामगाव अर्बन कॉ-ऑप बँक, लि., विदर्भ साहित्य संघ, शाखा खामगाव, दस्तूर रतनजी ग्रंथालय, गो.से.महाविद्यालय व सु.रो.मोहता महिला महाविद्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने पाडवा पहाट या             कार्याक्रमाचे आयोजन चैत्र शुद्ध प्रतिपदा, गुढीपाडवा      म्हणजेच रविवार दिनांक ३० मार्च २०२५ रोजी पहाटे          ठिक ०५ वाजता टिळक स्मारक महिला मंडळ,  खामगाव येथे आयोजित केले आहे. यावर्षी  अभिजात माय मराठी चा प्रवास स्थानिक कलाकार उलगडणार आहेत. हा कार्यक्रम जिल्हासंघाचालक बाळासाहेब काळे, तालुका संघचालक संतोष देशमुख, नगर संघचालक प्रल्हाद निमकंडे, खामगाव अर्बन बँकेचे अध्यक्ष.विजय पुंडे, राज्याचे कामगार मंत्री ॲड.आकाश फुंडकर यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न होणार आहे. सर्व स्तरातून या कार्यक्रमाची आतुरतेने वाट बघण्यात येते. मागिल दोन वर्षांपासून पाडवा पहाट कार्यक्रम हा दरवर्षी संस्कार भारतीच्या मुख्य आयोजना मध्ये आयोजित केला जातो. यंदाचे हे ३ रे वर्ष असून, सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित राहावे, आयोजकांचा तथा स्थानिक कलाकारांचा उत्साह वाढवावा व नववर्षाचे उत्साहात स्वागत करावे असे आवाहन संस्कार भारती, बुलढाणा जिल्ह्याच्या वतीने करण्यात येत आहे.




Post a Comment

أحدث أقدم