जेसीआय खामगांव सिटीच्या वतीने झोन लेव्हल क्रिकेट टुर्नामेंट संपन्न

 टर्फ क्रिकेटचा थरार खामगांवकरांनी अनुभवला

खामगांव जेसीआय खामगांव सिटीच्या वतीने दि. 8 व 9 मार्च 2025 रोजी सिटी स्पोर्ट टर्फ खामगांव येथे झोन लेव्हल क्रिकेट टुर्नामेंट संपन्न झाली. दि. 8 मार्च रोजी सकाळी महिला दिनानिमित्त महिलांचा पुष्पगुच्छ देवुन सत्कार करण्यात आला व नंतर 11 वाजता क्रिकेट स्पर्धेला सुरूवात करण्यात आली. यावेळी मुख्य अतिथी म्हणून आयपी झेडपी सौरभ बरडीया, गेस्ट ऑफ ऑनर शैलेश गुप्ता, झोन प्रेसीडेन्ट कुशल झंवर, झोन व्हाईस प्रेसीडेन्ट शालीनीताई राजपुत यांची उपस्थिती होती. क्रिकेट स्पर्धेत अकोला, वाशिम, चंद्रपुर, वणी, चिखली, अमरावती, नाशिक, खामगांव मिळून एकूण 10 टिम सहभागी झाल्या होत्या. झोन लेव्हल क्रिकेट टुर्नामेंट प्रेसीडेन्ट साकेत गोयनका यांच्या अध्यक्षतेखाली प्रथमच खामगांव येथे संपन्न झाला.

स्पर्धेमध्ये प्रथम विजेता टिम अमरावती सेंचुरियन यांना प्रथम पारितोषीक 21 हजार रूपयांचे देण्यात आले. द्वितीय विजेता टिम अकोला यंगीस्तान यांना द्वितीय पारितोषीक 15 हजार रूपयांचे देण्यात आले. यावेळी बेस्ट टिम ऐन्ट्री, बेस्ट टिम लोगो, बेस्ट रिल, बेस्ट टी शर्ट, बेस्ट बॅटस्मन, बेस्ट बॉलर, ऑलराऊंडर, प्रत्येक स्पर्धेचे मॅन ऑफ दि मॅच यांना सुध्दा यावेळी बक्षिस देण्यात आले. यावेळी टर्फ ग्राऊंड सजविण्यात आले होते, साऊंड डिजे सिस्टीम, लाईटस्, स्टेज, क्रिकेट काँर्मेन्ट्रीसह दोन दिवस राहण्याची आणि भोजनाची व्यवस्था सुध्दा करण्यात आली होती.

या कार्यक्रमाचे मुख्य प्रायोजक चोटीवाला ग्रुपचे बुलडाणा जिल्ह्यातील सुपर स्टॉकीस्ट शैलेशजी गुप्ता हे होते. सह प्रायोजक इस्मो टाईल्स अॅण्ड ग्रेनाईट, एमएससीडीए, स्टुडीओ 07, मानकर हॉस्पीटल, एनसीए, लिटिल बाईटस् बाय शालिनी, पी.एच. गोल्ड, गुप्ता ब्रोकर्स, हॉटेल दुर्वांकुर, हाडा बिअरिंग हाऊस, हिंदुस्थान इंजिनिअरिंग, बग्गा नगर, आरकी लर्न यांनी स्पॉसरशिप दिली व यांच्या सहकार्याने सदर स्पर्धेचे यशस्वी आयोजन करण्यात आले.

यावेळी जेसीआयचे प्रेसीडेन्ट जेसी साकेत गोयनका, सेक्रेटरी जेसी विनम्र पगारीया, ट्रेझरर जेसी मिलन नावंदर, आयपीपी जेसी प्रणवेश राठी, प्रोजेक्ट डायरेक्टर जेसी संकेत नावंदर, को. प्रोजेक्ट डायरेक्टर जेसी अभिषेक राठी यांच्यासह जेसीआय सर्व पास्ट प्रेसीडेन्ट, पदाधिकारी व सदस्यांनी अथक परिश्रम घेतले.

Post a Comment

أحدث أقدم