फुले-शाहू-आंबेडकर यांचा विचार टिकवण्यासाठी काँग्रेस पक्षासोबत यावे -हर्षवर्धन सपकाळ 

महाराष्ट्रातील माळी समाजाच्या नेत्यांची बैठक संपन्न समाजाचे संघटन आणि प्रगतीसाठी महत्वपूर्ण चर्चा


प्रदेश कार्यालय मुंबई टिळक भवन येथे महाराष्ट्रातील माळी समाजाच्या प्रमुख नेत्यांची बैठक पार पडली. या महत्वपूर्ण बैठकीला काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष मा हर्षवर्धन सपकाळ यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले आणि समाजाच्या प्रगतीसाठी ठोस भूमिका मांडली. माळी समाज हा  छत्रपती शिवाजी महाराज , महात्मा फुले, राजर्षी शाहू महाराज, डॉ बाबासाहेब आंबेडकर  यांचे विचारांना व संत परंपरा मानणारा असुन काँग्रेस पक्ष ही हाच समतेचा व सर्वधर्म समभावाचा विचार घेऊन पुढे जात आहे . त्यामुळे माळी समाज बांधवांनी काँग्रेस पक्षासोबत यावे असे मत त्यांनी व्यक्त केले.

     समाजाच्या शैक्षणिक, सामाजिक आणि राजकीय हक्कांसाठी एकजूट होऊन माळी  समाजाच्या विकासासाठी काँग्रेस कटिबद्ध आहे आणि प्रत्येक घटकाच्या हक्कांसाठी पुढे राहील असे पुढे बोलताना सांगितले.यावेळी महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष गणेशराव पाटील यांची विशेष उपस्थिती होती. यावेळी मा .आमदार श्रीमती दिप्तीताई चौधरी , म्हाडाचे मा संचालक तथा प्रदेश काँग्रेस कमिटीचे उपाध्यक्ष किशोर कन्हेरे नागपूर, जेष्ठ नेते शंकरराव लिंगे सोलापूर, राजीव गांधी पंचायत राज संघटन चे राष्ट्रीय संयोजक अविनाश उमरकर जळगाव जा, राजीव गांधी पंचायत राज संघटनचे प्रदेशाध्यक्ष मा संजय ठाकरे यवतमाळ , चंद्रपूर मनपा चे माजी सभापती तथा नगरसेवक नंदकिशोर नगरकर, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे सचिव प्रकाश तायडे अकोला, खामगाव पं स चे माजी सभापती डॉ सदानंद धनोकार, विधानसभा पक्षनेते महेश गणगणे अकोट ,  महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबिसी विभागाचे सचिव अजय तायडे खामगाव, बुलढाणा जिल्हा काँग्रेस ओबिसी विभागाचे अध्यक्ष प्रा गजानन खरात, काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी विजयराव महाजन एरंडोल, महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस ओबिसी विभागाचे कोअर कमिटी सदस्य तुकाराम माळी सांगली , काँग्रेस पक्षाचे प्रदेश प्रतिनिधी प्रशांत सुरसे पुणे, पातुर न प चे मा नगरसेवक सुरेंद्र उगले , खामगाव कृ ऊ बा स चे संचालक प्रमोदभाऊ चिंचोळकर, महा . प्रदेश काँग्रेस ओबिसी विभागाचे सचिव गणेश राऊत बिड, निलेश हाडोळे अकोला, सुनील शिंदे भिवंडी, यवतमाळ जिल्हा काँग्रेस औद्योगिक सेलचे अध्यक्ष शशांक केंढे , महा प्रदेश काँग्रेस ओबिसी विभागाचे महासचिव अशोक इंगळे मेहकर, सांगोला तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष गणेश माळी  यांचेसह समाज बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.



Post a Comment

أحدث أقدم