पुतण्याने केली काकाची निर्घृण हत्या 

२४ तासांपूर्वी मृतकाने स्वतः पोलिसात येऊन जीवाला धोका असल्याची तक्रार केली होती

२४ तासांपूर्वी तक्रार देऊनही नांदुरा पोलिसांनी कारवाई न केल्याने झाली हत्या , नातेवाईकांचा आरोप

बुलढाणा जिल्ह्यातील नांदुरा तालुक्यातील सोनज या गावी पुतण्याने काकांना काल दिनांक 28 रोजी जुन्या वादातून मारहाण केली होती व कालच मारहाण केलेले काका गोपाल मनोहर बोके यांनी नांदुरा पोलिसात तक्रारही दिली होती. मात्र पोलिसांनी कुठली कारवाई न केल्याने आज सकाळी अगदी त्याच वेळेस तक्रारदार गोपाल मनोहर बोके वय 45 यांचा त्यांच्याच पुतण्या असलेला शुभम विठ्ठल बोके याने कुराडीने हत्या केली. खरंतर मृतक गोपाल बोके यांनी कालच नांदुरा पोलिसात माझ्या जीवाला धोका असल्याची तक्रार दाखल केली होती. मात्र पोलिसांनी कुठलीही कारवाई न केल्यामुळे शेतकरी असलेले गोपाल मनोहर बोके यांची हत्या झाली असा आरोप मृतकाच्या नातेवाईकांनी केलं व त्यामुळे मृतकांच्या नातेवाईकांनी पोलीस स्टेशन समोरच ठिय्या देत या प्रकरणात नांदुरा पोलिसांनी 24 तास आधी तक्रार केल्यावरही कारवाई करण्यास दिरंगाई  केल्याने पोलीसना ही आरोपी करण्याची मागणी केली आहे , सध्या मृतकाचा शव हे सर्व विच्छेदन करण्यासाठी शासकीय रुग्णालयात आहे तर मृदकांचे नातेवाईक पोलीस स्थानकात ठिय्या देऊन आहेत.

Post a Comment

أحدث أقدم