IEDSSA च्या वतीने आयेजित आंतरमहाविद्यालयीन क्रीडास्पर्धामध्ये सिध्दिविनायक टेक्नीकल कॅम्पस, शेगांव च्या विद्यार्थ्यांची चमकदार कामगिरी
खामगाव जनोपचार :- दरवर्षीप्रमाणे यावषीही IEDSSA अंतर्गत प्रत्येक झोनमध्ये आंतरमहाविद्यालयीन क्रीडास्पर्धेचे दि. 19/01/2025 ते दि. 08/02/2025 पर्यंत आयोजित करण्यात आले आहे. यामध्ये दि. 06/02/2025 रोजी H झोनमध्ये पार पडलेल्या क्रीडास्पर्धेत विभागातील तंत्रनिकेतन महाविद्यालयांनी सहभाग नोंदविला. या क्रीडास्पर्धेमध्ये सिध्दिविनायक टेक्नीकल कॅम्पसच्या विद्यार्थ्यांनी चमदार कामगिरी करीत महाविद्यालयाला एकुण दोन मानांकने प्राप्त करुन दिली. विद्यार्थ्यांनी कुस्ती या क्रीडा प्रकारामध्ये विजेते पद पटकाविले. ही स्पर्धा विविध वजनगटामध्ये खेळविली जाते त्यापैकी महाविद्यालयातील कृष्णा धनोकार या विद्यार्थ्यांने 65 वजनगट आणि 85 वजनगटामध्ये सोहम सातव या विद्यार्थ्यांनी प्रथम क्रमांक पटकाविला. या विजयी संघाचे प्रशिक्षक म्हणून प्रा. ज्ञानेश्वर फुंडकर, प्रा. निखिल निंबाळकर, प्रा. रुपेश सोंळके यांनी काम पाहिले.
संस्थेचे अध्यक्ष सागरदादा फुंडकर तसेच संस्थेचे उपाध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे कामगार मंत्री मा. ॲड. श्री आकाशदादा फुंडकर, अभियांत्रिकी महाविद्यालयाचे प्राचार्य, डॉ. अनंत कुळकर्णी, उपप्राचार्य अशोक कंकाळे तंत्रनिकेतन महाविद्यालयाच्या प्राचार्या प्रिती चोपडे, डॉ. पि. व्ही. पिंगळे यांनी विजेता व उपविजेता संघातील सर्व विद्यार्थी व प्रशिक्षक प्राध्यापकांचे अभिनंदन करुन भविष्यातही अशा चमकदार कामगिरी करण्यासाठी सर्व विद्यार्थ्यांना शुभेच्छा दिल्या.
إرسال تعليق