बुलढाणा जिल्हयातील कामगारांची मेडिकलची बिले १ वर्षापासून E.S.I.C कडे प्रलंबित 

भारतीय मजदूर संघाचे कामगार मंत्र्यांना निवेदन

बुलढाणा जिल्हयातील असंख्य कामगारांची मेडिकलची बिले १ वर्षापासून E.S.I.C कडे प्रलंबित असल्याने भारतीय मजदूर संघाचा वतीने कामगार मंत्री नामदार आकाश दादा फुंडकर यांना निवेदन देण्यात आले.

निवेदनात नमूद आहे की बुलढाणा जिल्हामधील कामगारांची मेडिकलची बिले वर्षापासून E.S.I.C खामगांव ऑफिसकडे पेंडींग आहेत. डॉ. बेंबले साहेब हे कामगारांना उडवा उडविची उत्तरे देतात तसेच कामगारांसोबत उध्दट बोलतात. बिले नागपूर ऑफिसला मंजूरीकरीता पाठविल्यानंतर नागपूर ऑफिसकडून डॉक्टर यांची सही नसल्याकारणामुळे E.S.I.C खामगांव ऑफिसकडे परत पाठविण्यात येते, जबाबदारीने कोणतेच काम डॉ. बेंबले साहेब करीत नाहीत. करीता माननीय नामदार साहेब जिल्हयातील कामगारांची मेडिकलची बिल त्वरित मिळण्यात यावी व कामगारांना गैरसोय पुढे होणार नाही याकरीता आम्ही विनंती करीत आहोत व डॉ. बेबले  यांना समज देउन वरिष्ठ पातळीवर त्यांची चौकशी करण्यात यावी व त्यांच्यावर योग्य ती कारवाई करण्यात यावी ही विनंती.

Post a Comment

أحدث أقدم