बुलढाणा जिल्हा पत्रकार संघातर्फे बुलढाणा येथे खामगावचे ज्येष्ठ संपादक श्री. जगदीशजी अग्रवाल यांना "पत्रयोगी जीवन गौरव पुरस्काराने"आज सन्मानित करण्यात आले.
यावेळी केंद्रीय मंत्री प्रतापरावजी जाधव, कॅबिनेट मंत्री आकाशदादा फुंडकर, आमदार संजय गायकवाड, आमदार संजय कुटे, बुलढाणा अर्बनचे सर्वेसर्वा राधेश्याम चांडक आणि अनेक मान्यवर, तसेच बुलढाणा जिल्हा पत्रकार संघाचे अध्यक्ष रणजीतसिंग राजपूत, व जिल्ह्यातील पत्रकार बांधव मोठ्या संख्येने उपस्थित होते.
खामगाव शहरातील ज्येष्ठ पत्रकारांचा देखील पुरस्कार देऊन सन्मान
मराठी पत्रकार परिषदे तर्फे "पत्रयोगी पत्रकार परिषद पुरस्कार" देऊन खामगाव शहरातील जेष्ठ पत्रकार जगदीश अग्रवाल, सागर मोदी, गिरीश पळसोदकर, वा.ना.वाडे आदींचा सत्कार आज बुलढाणा येथे करण्यात आला. केंद्रीय मंत्री प्रतापराव जाधव, कामगार मंत्री मंत्री आकाश दादा फुंडकर यांच्यासह मान्यवरांच्या उपस्थितीत हा पुरस्कार प्रदान करण्यात आला.
إرسال تعليق