श्री गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त ढोरपगाव येथे मोफत तपासणी शिबिर संपन्न

 डॉ. नितीश अग्रवाल यांनी केली 100 रुग्णांची तपासणी

ढोरपगाव: जनोपचार न्यूज नेटवर्क - समर्थ सद्गुरु श्री गजानन महाराज यांच्या प्रकट दिनानिमित्त ढोरपगाव येथे श्री श्याम क्लिनिक, तिरुमल मेडिकल स्टोअर्स व श्री शांताराम भाऊ तायडे यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत तपासणी शिबिर संपन्न झाले. दिनांक 15 फेब्रुवारी, शनिवार रोजी खामगाव येथील सुप्रसिद्ध अस्थिरोग विशेषज्ञ डॉ. नितीश जगदीश अग्रवाल यांनी रुग्णांची तपासणी करून त्यांचे मार्गदर्शन केले. यावेळी 100 च्या वर रुग्णांनी शिबिराच्या सेवेचा लाभ घेतला. या शिबिरासाठी डॉ. लवित वर्मा, रवींद्र सोनवणे, शांताराम भाऊ तायडे तसेच गजानन महाराज संस्थान ढोरपगाव चे अध्यक्ष साहेबराव मुंढे, उपाध्यक्ष त्र्यंबक मुंढे, सचिव रामभाऊ टिकार, विष्णू भगत, विनोंद हिवरकार, उमेश तांगडे, देविदास मामनकार, विलास भातोकार, रामेश्वर मुंढे, कीशोर चोपडे, पांडुरंग तायडे व गावकरी मंडळ यांनी परिश्रम घेतले.



Post a Comment

أحدث أقدم