ठाकरे मल्टी स्पेशलिटी हॉस्पिटल व क्रिटिकल केअर मध्ये गर्भ पिशवीची यशस्वी शस्त्रक्रिया!
खामगाव : जनोपचार न्यूज नेटवर्क :- ठाकरे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल व क्रिटिकल केअर मध्ये गर्भ पिशवीची यशस्वी शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. शेगाव येथील 52 वर्षीय महिलेस पोटात दुखणे आणि रक्तास्त्राव होत असल्याने उपचारासाठी ठाकरे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल व क्रिटिकल केअर मध्ये दाखल करण्यात आले. सदर महिलेची गर्भ पिशवी खराब झालेली होती. गर्भ पिशवी काढली नाही तर कॅन्सर तसेच अन्य आजारांचा धोका होता. ठाकरे मल्टीस्पेशलिटी हॉस्पिटल मधील सुसज्ज आणि अध्ययावत ऑपरेशन थिएटर मध्ये महिलेवर शस्त्रक्रिया करून गर्भपिशवी काढण्यात आली. खामगाव येथील स्त्रीरोग तज्ञ डॉ. गौरव ठाकरे यांनी ही शस्त्रक्रिया केली. डॉ निखिल ठाकरे यांनी महिलेवर योग्य उपचार करून त्यांची प्रकृती ठणठणीत केली. उपचारानंतर महिलेस सुट्टी देण्यात आली. रुग्ण महिलेच्या नातेवाईकांनी डॉक्टरांचे आभार मानले.
إرسال تعليق