श्रीमती माधुरी चंद्रकांत सातपुते यांना क्रांतीज्योती आदर्श महिला पुरस्कार जाहीर
जुनोपचार न्यूज नेटवर्क:- सांगली जिल्ह्यातील हिंगणगाव खुर्द येथील अंगणवाडीवर मदतनीस म्हणून कार्य करणाऱ्या श्रीमती माधुरी चंद्रकांत सातपुते यांना पहाट फाउंडेशन या संस्थेमार्फत क्रांतीज्योती आदर्श महिला पुरस्कार जाहीर झाला असून त्यांना हा पुरस्कार 23 फेब्रुवारी 2025 रोजी शेगाव येथे होणाऱ्या राज्यस्तरीय ग्रामविकास परिषदेमध्ये सन्मानपूर्वक प्रदान करण्यात येणार आहे. श्रीमती सातपुते ह्या त्यांचे अंगणवाडीतील काम सांभाळून समाजसेवेमध्ये सतत कार्यरत असतात. त्यांनी ग्रामीण भागामध्ये शासकीय योजना तळागाळातील लोकांपर्यंत पोहोचविण्याचे काम प्रामाणिकपणे केले असून त्यांची समाजाप्रती व तळागाळातील लोकांप्रती असणारी तळमळ पाहता त्यांनी केलेले कार्य हे खरंच कौतुकास्पद व आदर्श आहे. ग्रामीण भागातील समाजासाठी तसेच विद्यार्थ्यांसाठी केलेल्या कार्याची दखल घेऊन पहाट फाउंडेशनच्या वतीने हा पुरस्कार त्यांना जाहीर करण्यात आला आहे. पुरस्कार जाहीर केल्याबद्दल सर्व स्तरावरून त्यांचे कौतुक करण्यात येत आहे.
إرسال تعليق